महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सातारा, दि. २२ मार्च : कराड तालुक्यातील उत्तर पार्ले येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहातील महिला गृहपाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडली होती. यावेळी सदर संशयित महिलेने तिच्या जबाबामध्ये आणि रेकॉर्डिंगमध्ये सातारा येथील समाजकल्याण सहाय्यक आयुक्त नितीन उबाळेच्या नावाचा उल्लेख केलेला होता. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाच्या संशयाची सुई उबाळेकडे होती. सहाय्यक आयुक्त नितीन उबाळेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कारवाई करणार का ? याबाबत महाराष्ट्र न्यूजने आवाज उठवला होता. महाराष्ट्र न्यूज च्या बातमीची दखल घेऊन सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उबाळेची सखोल चौकशी करण्याबाबतचे पत्र समाजकल्याण विभागाला पाठविण्यात आल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी महाराष्ट्री न्यूज शी बोलताना दिली. याबाबत अधिक माहिती अशी, कराड तालुक्यातील उत्तर पार्ले येथील बी. सी. ई. बी. सी. मुलींच्या शासकीय वसतिगृहातील गृहपाल (हाऊसकिपिंग) महिला रत्नमाला रामदास जाधव हिने १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून संशयित महिलेला रंगेहाथ पकडण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. यावेळी संशयीत महिलेने तिच्या जबाबामध्ये आणि रेकॉर्डिंगमध्ये समाजकल्याण विभागातील विविध प्रकरणे मंजूर करून घेण्यासाठी साहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांना पैसे द्यावे लागतात. त्यामुळे मुलींच्या शासकीय वसतिगृहातील महिला गृहपाल लाचलुचपत जाळ्यातील या संपूर्ण प्रकरणामध्ये संशयाची सुई समाजकल्याण सहाय्यक आयुक्त उबाळेकडे होती. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने लावलेल्या सापळ्यामध्ये केवळ संशयित महिला रत्नमाला जाधव ही एकटीच नसून, त्यामध्ये समाजकल्याण विभागातील बडे मासे सुद्धा भागीदार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असलेबाबतचे वृत्त महाराष्ट्र न्यूज ने प्रसिद्ध केले होते. समाजकल्याण विभागातील या बड्या मास्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोणती कारवाई करणार ? याबाबत महाराष्ट्रीयन योजना आवाज उठविला होता. महाराष्ट्र न्यूज मधील या वृत्ताची दखल घेऊन सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे समाजकल्याण सहाय्यक आयुक्त उबाळेची कसून चौकशी करण्यासाठीचे पत्र उपअधिक्षक अशोक शिर्के यांनी समाज कल्याण विभागाला पाठवले असल्याचे खात्रीलायकरित्या समजते.*

लाचलुचपत विभागाने भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करणे गरजेचेलाचेच्या माध्यमातून समाजामध्ये तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये लागलेल्या भ्रष्टाचाराच्या किडीचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने समूळ उच्चाटन करणे, ही काळाची गरज आहे. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या पगारातच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे क्रमप्राप्त असताना कार्यालयमध्ये येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्याकडून शासकीय कामासाठी पैशाची मागणी केली जाते, ही बाब अत्यंत लांच्छनास्पद आणि शरमेची आहे. समाजातील तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पूर्ण क्षमतेने काम करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांच्याकडून व्यक्त केली जात आहे.
































