महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : कराड शहरातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता दहावीत शिकत असणाऱ्या व सध्या बोर्डाची परीक्षा देत असलेल्या एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या विद्यार्थिनींने दहावीची परीक्षा सुरू झाल्यानंतर पहिले दोन पेपर दिले मात्र त्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागल्यानंतर स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र पून्हा तिच्या छातीत वेदना होत असल्याने सूरूवातीस श्री हाॅस्पिटल व नंतर कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचार सूरू असतानाच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
कराड शहरातील रुक्मिणीनगर परिसरातील एका काॅलनीत राहत असलेल्या सामान्य कुटुंबातील स्नेहा डूबल ही शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता दहावीत शिकत होती. ती हूशार होती. परिक्षा असल्याने तिचे लक्ष आभ्यासाकडे होते. गत आठवड्यात दहावीची परीक्षा सुरू झाली. स्नेहा दहावीच्या परिक्षाला सामोरी गेली. पहिला दूसरा पेपर ही दिला मात्र त्यानंतर स्नेहाला पोट व छातीत वेदना सुरू झाल्याने तिच्या आईने उपचारार्थ खासगी रूग्णालयात दाखवले मात्र पून्हा त्रास झाल्याने तिला कृष्णा हाॅस्पिटलमध्ये दाखल केले.दोन तीन दिवस उपचार सूरू असताना आज तिचा आकस्मित मृत्यू झाला. स्नेहा ही सर्व मूलींच्यामध्ये नेहमी प्रत्येक उपक्रमात उत्साहाने सहभागी होत असे. तिच्या अशा जाण्याने तिच्या मैत्रिणीनां धक्काच बसला आहे. या घटनेमुळे तिच्या वर्ग मैत्रिनींमध्ये अस्वस्था पसरली असुन सर्वांनी तिच्या घराकडे धाव घेतली आहे.
दरम्यान सायंकाळी उशिरा स्नेहावर तिच्या मूळगावी ओगलेवाडी येथे अंत्यंसंस्कार करण्यात आले.स्नेहा नंतर तिच्या कुटूंबात तिचा भाऊ आई व वडील असा परिवार आहे.