महाराष्ट्र न्यूज प्रतिनीधी / नीरा :
उत्तर प्रदेशातील चर्चित अयोध्या राम मंदिरासाठी गेल्या महिन्यापासून देशभरात देणग्या जमा करण्यासाठी मोहीम सुरू आहे. या मोहिमेंतर्गत राम मंदिरासाठी आत्तापर्यंत १५०० कोटी रुपयांहून अधिक निधी गोळा करण्यात आल्याची माहिती ‘श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ समितीकडून देण्यात आलीये.
१५ जानेवारी रोजी देशभरात देणगी मोहिमेला प्रारंभ करण्यात आला होता. ही मोहीम येत्या २७ फेब्रुवारीपर्यंत सुरू होती.
या मोहिमेत विश्व हिंदू परिषदेचे जवळपास १.५ लाख कार्यकर्ते सहभागी झाले होते. राम मंदिरासाठी घरोघरी जात देणग्या गोळा करण्यात आल्या.याच अनुषंगाने नीरा गावात देखील राम मंदिर साठी राम भक्तांकडून १ लाख,९६ हजार,आठशे साठ रुपये देणगी गोळा करण्यात आली.घरोघरी जावून पूर्ण केलेले अभियान आणि यास भक्तांकडून मन मोकळे पणाने निधी दिला गेला असे मोहीम राबविणाऱ्या कडून सांगण्यात आले. राम मंदिर निधी संकलन अभियान नीरा यामध्ये उपस्थित नाना जोशी,ओंकार कदम,आकाश बाबर,डॉ.निनाद खळदकर,भैय्या जेधे,अनंता उपाध्ये,चिन्मय भालेराव,प्रताप भोसले ,प्रशांत ताटे,मोहन थोपटे,तेजस निगडे ,उन्मेश कदम ,भाऊ गवळी,दिपक डागा,जितेंद्र जठार, प्रसन्ना पुरंदरे यांच्या कडून निधी संकलन अभियान मोहीम पूर्ण करण्यात आली.