नवारस्ता प्रतिनिधी : श्रीमती विजयादेवी देसाई सिनिअर काँलेजच्या अग्रणी महाविदयालय उपक्रमांतर्गत “ताणतणावाचे व्यवस्थापन व आरोग्य ” – या कार्यशाळा प्रसंगी ते बोलत होते. कोरोना नंतरच्या कालावधी मध्ये ताणतणावाच्या अनेक समस्या उद्भवतना दिसतात. यामागील कारण म्हणजे जनतेची बदलती जीवनपद्धती व चुकीची आहार पद्धतीमूळे आज अनेक आजार उद्भवताना दिसतात.
निरामय आरोग्यासाठी नियमीत चौरस आहार, चांगल्या सवयी व योगासने करणे गरजेचे आहे.
श्री. मधुकर पाटील यांनी योगासने व सूर्यनमस्कारांचे मानवी जीवनातील महत्व सांगून त्यांची प्रात्यक्षिके करून दाखविले. नियमीत योगासने केल्याने मानवी जीवन तणावमुक्त राहण्यास मदत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविदयालयाचे प्राचार्य श्री.कांबळे सर होते. तर कार्यक्रमांचे प्रास्ताविक प्रा. पी. एम. घोणे यांनी केले. आभार प्रा. कु. पी. आर. यादव यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. सौ. एस. एस. शिंदे यांनी केले. या कार्यक्रमास विदयार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.