पाटण तालुक्यातील केरळ भागातील धडामवाडी गावचे ग्रामदैवत आमजाई देवीचे मंदिर हे गेले कित्येक दिवस अंधारमय होते. परंतु ग्रामपंचायत धडामवाडी व ग्रामस्थ यांच्या प्रयत्नाने देवीचे मंदिर व परिसर प्रकाशमय करण्यात आला आहे.
पाटण तालुक्यातील धडामवाडी हे गाव केरळ भागातील चांगले गाव म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु गेले कित्येक दिवस गावातील ग्रामदैवत असलेले देवीचे मंदिर अंधारात होते. हे लक्षात येताच गावचे लोकनियुक्त सरपंच हणमंतराव कदम, उपसरपंच तुकाराम साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र कदम व सर्व सदस्य यांच्या सहकार्याने ग्रामदैवत देवीचे मंदिर व मंदिर परिसर प्रकाशमय करण्यात आला. यावेळी धडामवाडी चे सामाजिक कार्यकर्ते प्रा. रघुनाथ संकपाळ यांनी ही सहकार्य केले. असे यावेळी सांगण्यात आले