वन्य प्राण्यांची शिकार केल्याबद्दल कोठडी
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी सातारा :-
सह्याद्री व्याघ्र राखीव मधील बामणोली परिक्षेत्रातील वलवण नियतक्षेत्रात फासा लावून साळींदर या अनुसूची 4 मधील वन्यप्राण्याची शिकार झाल्याच्या गुप्त बातमी वरून महादेव कोंडीराम जाधव व पांडुरंग महादेव जाधव ,रा. उगवतीवाडी वलवण या संशयितांची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबुल केला, त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9,27,29 अन्वये दि १२/०८/२०२० रोजी गुन्हा नोंदवण्यात आला व दि १३/०८/२०२०२ रोजी मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी महाबळेश्वर यांचे समोर आरोपीना हजर केले असता पाच दिवसाची वनकोठडी मिळाली आहे . प्रकरणी पुढील तपास चालू आहे.
सदर कारवाई मा. एम.एन. मोहिते, उपसंचालक स.व्या.रा. कोल्हापूर स्थित कराड, मा. एस.सी. साळुंखे, सहा. वनसंरक्षक कोयना यांचे मार्गदर्शनाखाली बी.डी. हसबनिस वनक्षेत्रपाल बामणोली,
एस.एस. कुंभार वनपाल वलवण(अतिरिक्त कार्यभार), एस. एस. शेंडगे वनरक्षक वलवण, ए. बी. सावंत वनरक्षक आरव, सुमित चौगुले वनरक्षक वाघावळे, आर. व्ही. भोपळे वनरक्षक र.घाट नाका, आर. एस. आवारे वनरक्षक कारगाव यांनी केली.