प्रणाली कदम / महाराष्ट्र न्युज वाई प्रतिनिधी
दिनांक ०२/०४/२०२२ रोजी वाई वनपरिक्षेत्रातील मौजे वेळे फॉ. कं. नं. ३६ मधिल सोळशी घाटामधील राखीव वनक्षेत्रास अज्ञात इसमाने आग लावल्याचे कळून येताच संग्राम मोरे वनपाल भुईंज, कवठे गावातील माजी सैनिक सचिन पोळ, मयूर डेरे, तूषार पोळ, गणेश डेरे, जितेंद्र राऊत, अमोल इथापे, राहूल मोरे तसेच वेळे गावातील लक्ष्मण जाधव व ओमकार, नलावडे यांनी जागेवर जावून राखीव वनक्षेत्रात लागलेली आग तात्काळ विझवली.
आगीच्या वहिमावरून व गुप्त बातमीवरुन अधिक तपास केला असता आण्णा बापू माने मुळ रा-खेड ता- खंडाळा जिल्हा सातारा हल्ली रा -वेळे ता.वाई जिल्हा सातारा या आरोपीने मौजे वेळे वनक्षेत्रातील सोळशी घाटामध्ये जावुन जाणीवपुर्वक आग निर्माण केली, सदरची पेटती आग आवाक्याबाहेर गेलेने लगतचे मालकी क्षेत्रातून मौजे वेळे फॉ. कं. नं. ३६ मधील राखीव वनक्षेत्र जळीत झाल्याचे तपासात सिध्द झाले. आरोपीने गुन्हा कबूल केला असुन आरोपीवर वनरक्षक बोपेगांव यांनी भारतीय वनअधिनियम, १९२७ चे कलम २६ (१)(ब)(फ) अन्वये गुन्हा दाखल केला. सदरची कार्यवाही महादेव मोहीते उपवनसंरक्षक सातारा वनविभाग सातारा तसेच सुधीर सोनावले सहा.वनसरंक्षक वनीकरण सातारा, व स्नेहल मगर वनपरिक्षेत्र अधिकारी वाई, यांचे मार्गदर्शनाखाली संग्राम मोरे वनपाल भुईंज करीत आहेत.