महाराष्ट्र न्यूज/फलटण : सुप्रसिद्ध कृषिसंशोधक पद्मश्री बनबिहारी विष्णू निंबकर यांचे वृद्धापकाळाने दि. २५ ऑगस्ट रोजी निधन झाले. आज फलटण येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या पत्नी जाई निंबकर व डॉक्टर कन्या नंदिनी, मंजिरी व चंदा यांसह कुटुंबियांची भेट घेऊन शरद पवारांनी सांत्वना केली.
५० च्या दशकात अमेरिकेतून भारतात स्थायिक होऊन फलटणजवळ त्यांनी निंबकर ॲग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट सुरू केली होती. कापसाचं नवं वाण विकसित करून महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञानाची कवाडं उघडली. पशुपालनाच्या क्षेत्रात विशेषतः मेंढीपालनात त्यांनी पिन्क रिव्होल्यूशन आणलं. मॅफकोच्या लोकप्रिय दुग्धपेयाला एनर्जी हे नावंही त्यांनीच दिलं. कृषिक्षेत्रातील कार्यासाठी त्यांना प्रतिष्ठेच्या जमनालाल बजाज पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते.
































