मुंबई : कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी अनेक उपायांचा आधार घेतला जात आहे. शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी घरगुती काढा, बाजारात मिळणारी औषधं तसेच आयुर्वेदाचाही आधार घेण्यात येत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपल्याला COVID-19 पासून बचाव करायचा असेल तर, सर्वात आधी सर्व कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे. तसेच कोरोनापासून बचाव करण्यासाठी शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आयुष मंत्रालयानं कोरोना पासून बचाव करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते. आयुर्वेदात हे उपाय अत्यंत प्रभावी ठरत असल्याचं सांगितलं जात आहे.
आयुष मंत्रालयानं सांगितलेले उपाय पुढिलप्रमाणे :
- 1. दिवसभरात गमर पाण्याचं सेवन करा. सकाळी, संध्याकाळी गरम पाण्यात चिमुटभर मीठ आणि हळद टाका आणि या पाण्यानं गुळण्या करा.
- 2. घरी तयार केलेलं ताजं आणि पचण्यास हलकं असणाऱ्या अन्नाचं सेवन करा. जेवणार जीरं, धने, हळद, सुंठ आणि लसणाचा वापर करा.
- 3. व्हिटॅमिन सीसाठी लिंबू आणि आवळ्याचं सेवन करा. आवळा आणि लिंबू यांचं समावेश असणाऱ्या पदार्थांचाही वापर करु शकता.
- 4. दररोद कमीत कमी 30 मिनिटांसाठी योग, प्राणायाम आणि मेडिटेशन करा.
- 5. दिवसा झोप घेण्याऐवजी रात्री 7 ते 8 तासांसाठी झोप घ्या.
- 6. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सकाळी-संध्याकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासह च्यवनप्राश खा.
- 7. रात्री हळदीच्या दूधाचं सेवन करा. एक ग्लास दूधात जवळपास अर्धा चमचा हळद एकत्र करुन त्याचं सेवन करा.
- 8. दररोज दिवसातून दोन वेळा जेवणानंतर कोमट पाण्यासोबत गुळवेल 500 मिलीग्रॅम/अश्वगंधा 500 मिलीग्राम घेऊ शकता.
- 9. तुळस, काळी मिरी, सुंठ आणि दालचिनी यांपासून तयार करण्यात आलेला हर्बल चहा किंवा काढ्याचं सेवन करा.
- 10. सकाळ-संध्याकाळी नाकात तिळाचं तेल, खोबऱ्याचं तेल किंवा गाईच्या दूधापासून तयार केलेलं तूप घाला.
- 11. कोरडा खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी वाफ घ्या. वाफ घेताना पाण्यात पुदिन्याची पानं, ओवा किंला कापराचा वापर करु शकता.
- 12. दिवसातून दोन वेळा लवंग किंवा ज्येष्ठमध पावडर मध किंवा साखरेसोबत एकत्र करुन खा. यामुळे खोकला, घशातील खवखवीपासून आरम मिळेल.