महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांनी कराड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, कराड नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते सौरभ पाटील (तात्या), नंदकुमार बटाणे, गंगाधर जाधव, सादिक इनामदार, शिवाजी पवार, सुहास पवार, रविंद्र मुंढेकर, अख्तर आंबेकरी, अमोल सोनवले, भारत थोरवडे, मंगेश वास्के, राहुल भोसले, सोहेब सुतार, सतीश भोंगाळे, सचिन चव्हाण, अजय सूर्यवंशी, रत्नाकर कांबळे तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
यावेळी नामदार बाळासाहेब पाटील म्हणाले की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती देशभरात आज मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश लोकशाही मार्गाने पुढे गेला पाहिजे यासाठी राज्यघटना तयार करण्यात आली, याच सर्व काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटना अंमलात आली.
तेव्हापासून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. आज हा देश सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन पुढे जात आहे. हे करत असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहली, त्यास अभिप्रेत असा कारभार देशामध्ये सुरू ठेऊन सामंजस्य वातावरण ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
परंतु काही लोक या विचारांना छेद देण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र सर्वधर्मसमभाव विचाराने पुढे जाण्याची या देशाला गरज आहे, आणि त्या विचाराने आपण मार्गक्रमण केले पाहिजे.