पाटण /प्रतिनिधी महाराष्ट्र भाग्यलक्षमी अशी ओळख असलेल्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून यामुळे धरणाच्या शिवाजीसागर जलाशयात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे. जलाशयातील पाण्याची पातळी सहा वक्र दरवाज्यापर्यंत पोहचली आहे. जुलै महिन्याच्या अखेरच्या काही दिवसांत कोयना धरण परिसराला जोरदार पावसाने चांगलेच झोडपून काढत ब-याच दिवसांची कसर भरून काढली,धरणांर्तगत असलेल्या महाबळेश्वर, बामणोली, नवजा, कोयना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला यामुळे जलाशयात सरासरी सुमारे १२२७७८ क्युसेक्स पाण्याची प्रचंड आवक वाढली होती, दरम्यान पाण्याची आवक प्रचंड वाढल्याने धरण लवकरच भरेल आशी आशा निर्माण झाली होती मात्र गेल्या तीन दिवसांपासून या ठिकाणी पावसाचा जोर बराच कमी झाला असल्याने यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली असुन सध्या धरणात सरासरी १३७०० क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.दरम्यान रविवारी सकाळी दहा वाजता धरणातील पाण्याची पातळी सहा वक्र द्वार (सांडवा माथा) पर्यंत पोहचली. रविवारी सायंकाळ पर्यंत धरणातील पाण्याची पातळी २१३४”००” फुट (६५०.४४३ मीटर) झाली असून पाणीसाठा ७३.६३ टिएमसी झाला आहे.एकंदरीत धरणातील पाणीसाठ्याची पंच्याहत्तरीकडे वाटचाल सुरू आहे. चौकट – पाऊस मिलीमीटर मध्ये कंसात एकूण *कोयना -५( २७०५) * नवजा – २४(२९६४) *महाबळेश्वर -३२(२८९८)* वळवण -३४(३५७१)
सध्या कोयना धरणात मागील काही दिवसांच्या तुलनेत पाण्याची आवक कमी आहे.सध्या कोणत्याही प्रकारे धरणातून विसर्ग सोडण्याचे नियोजन नाही .तरी धरण परिचालन सूची (ROS) नुसारच पाण्याचा साठा व आवक विचारात घेऊन धरणातून विसर्ग सोडण्याचा निर्णय घेतला जाईल . विसर्ग सोडण्या पूर्वी सर्वाना पूर्व कल्पना देऊनच सोडला जातो . तरी कृपया कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.
कुमार पाटील कार्यकारी अभियंताकोयना सिंचन विभाग कोयनानगर,