फलटण – पुणे येथील भूमी यांच्यातर्फे माण तालुक्यातील आरोग्य विभागाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे लोकार्पण करण्यात आले.दहिवडी ता.माण येथील माण पंचायत समितीच्या सभागृहात हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.याप्रसंगी भूमीचे हितेश सर ,वैभव पोरे ,माण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील ,तालुका आरोग्य अधिकारी लक्ष्मण कोडलकर, डॉ.राकेश रामेश्वर पडुळे ,डॉ.शशिकांत जगदाळे ,डॉ.विजय लोखंडे,डॉ.राहुल मालगावे ,डॉ.तुषार खाडे ,डॉ.सुजीत खाडे,तसेच तालुका आरोग्य अधिकारी सर्व स्टाफ उपस्थित होता.वैभव पोरे म्हणाले , कोविड काळात मोठे संकट आलते.त्यावेळी ऑक्सिजन अभावि लोकांचे जीव जात होते.भूमी या स्वयंसेवी सामाजिक संस्थेने सामाजिक बांधीलकी जपत तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले होते.यामुळे अनेकांचे जीव वाचवण्यात याचा उपयोग झाला.त्यामुळे याच विभागांना हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कायमस्वरूपी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आज ते लोकार्पण करण्यात आले.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कोडलकर म्हणाले ,कोरोना काळात भूमी या संस्थेने आम्हाला मोलाची मदत केलीय.

पहिल्या लाटेत ऑक्सिजनविना अनेकांचे बळी गेले.ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी आरोग्य विभागाची धावपळ पाहून पोरे साहेबांनी भूमीच्या माध्यमातून आम्हाला मदत मिळवून दिली. गटविकास अधिकारी पाटील म्हणाले ,आरोग्य सेवेतील सर्वचजण आमचे कोविडयोध्दे आहेत.त्यांच्या कार्यास हातभार लावण्याचे काम भूमी यांनी केले आहे.हे तुमचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असून माणच्या वतीने आम्ही तुमचे आभार मानत आहे.यापुढेही संकटकाळात व गरजेच्यावेळी आम्हाला अशीच मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले.सूत्रसंचालन आरोग्य अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले.आभार डॉ.विजय लोखंडे यांनी मानले.






























