नवारस्ता प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील मुळगाव गावाचा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा 2005 नुसार दशवार्षिक सूक्ष्म आराखडा तयार, प्रायोगिक तत्त्वावर कार्यवाही; १० वर्षांचे सूक्ष्म नियोजनाचे काम चालू झाले असून मुळगाव हे गाव महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत समृद्ध होणार. याबाबत मिळालेली माहिती अशी की, आता ग्रामपंचायतीचा दशवार्षिक नियोजन आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांतून एका अशा ११ ग्रामपंचायतींचा १० वर्षांचा नियोजन आराखडा तयार करण्याचे काम प्रायोगिक तत्त्वावर हाती घेण्यात आले आहे. त्या पैकी पाटण तालुक्यातील मुळगाव ह्या गावची निवड झाली असून गावातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कुटुंबास करता येणाऱ्या २६२ कामांपैकी जास्तीत जास्त कामांचा लाभ देऊन कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावून कुटुंबास लखपती करणे आहे. त्याचसोबत गावामध्ये सार्वजनिक स्वरुपाची कामे घेवून गावामध्ये शाश्वत विकासाची कामे करुन गावांचा विकास साधणे व गाव समृध्द करणे असे दश वार्षिक नियोजन करण्याचा मुख्य हेतू आहे. मग्रारोहयो योजनेतून दश वार्षिक नियोजन केल्यास गावातील प्रत्येक कुटुंबाला लाभ देणे शक्य होणार आहे. यामध्ये ज्या कुटुंबांना मग्रारोहयोचे जॉब कार्ड पाहिजे आहे त्या कुटुंबांना जॉब कार्ड वाटप करण्यात येणार आहे. तसेच ह्या दश वार्षिक आराखड्यात फळबाग लागवड, वृक्ष लागवड, जनावरांचे गोठे, कुक्कुटपालन शेड, नाडेफ टाकी, विहिरी, शोषखड्ढे रस्ते अशी विविध प्रकारची कामे हाती घेण्यात येणार आहेत. पाटण तालुक्यातील मुळगाव ता. पाटण, ह्या गावाची तालुक्यातून निवड करण्यात आली आहे.त्या कार्यक्रमाची आज सांगता झाली. ह्या ४ दिवसीय कार्यशाळे प्रसंगी प्रथम दिवशी मा. मीना सांळुखे मॅडम, गटविकास अधिकारी सो वर्ग-१ पंचायत पाटणमा. आर. के. गायकवाड साहेब विस्तार अधिकारी पंचायत पाटण ह्या मान्यवरांच्या हस्ते सुरुवात झाली श्री. अभिजित जाधव – तांत्रिक सहाय्यक जावळी, गणेश कोळी तांत्रिक सहाय्यक पाटण, मिलींद माने तांत्रिक सहाय्यक कराड, संभाजी साठे तांत्रिक सहाय्यक पाटण, नितीन यादव तांत्रिक सहाय्यक कराड, सामजिक वनीकरण अधिकारी निकम साहेब व ग्रामपंचायत सरपंच श्री. ज्ञानदेव विठ्ठल पाटील, व उपसरपंच श्री. अमोल अरुण चव्हाण व तसेच ग्रामपंचायत सदस्य सर्व ह्या मान्यवरांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली उपक्रमाची सुरुवात करणेत अली व तसेच आवर्जून मुळगांव प्रशिक्षणाला भेट दिलेले जिल्हा परिषदेचे नरेगा चे गटविकास अधिकारी मा. धुमाळ साहेब व राज्य प्रशिक्षक समन्वय राठोड साहेब यांनी मुळगांव मध्ये कुटुंब सर्व्हेक्षण गाव फेरी शिवार फेरी मध्ये सहभागी होऊन सुलभ पद्धतीने मार्गदर्शन व तसेच सन २०२१-२०२२ वर्षातील सेल्फ वर विकास कामे असलेल्या पैकी जनावरांचा गोठा या दोन कामाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे गटविकास अधिकारी (नरेगा) मा. धुमाळ साहेब व राज्य प्रशिक्षक समन्वय राठोड साहेब यांच्या हस्ते करणेत आले व इतर उपक्रम पार पडले. व आराखड्याला मृत स्वरूप देण्यात आले. ह्या साठी गावपातळीवर काम करणाऱ्या ग्रामसेवक, कृषिसेवक, वनरक्षक, सामाजिक वनीकरण ,कनिष्ठ अभियंता, क्षेत्र सहायक, मुख्याध्यापक, शिक्षक, आरोग्यसेवक पोलिस पाटील, तांत्रिक सहायक, रोजगार सेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, बचतगट प्रतिनिधी, कृषिमित्र, समृध्द मित्र, शौचालय या व्यतिरिक्त मा. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ह्यांनी मुळगाव गावामध्ये पूर्णवेळ उपस्थित राहून गावाचे कुटुंब सर्वेक्षण, शिवार फेरी गावफेरी करून नियोजन आराखडा तयार केला आहे.
कुटुंबानुसार त्यांना कामे सुचवण्यात आली. कामामध्ये फळबाग लागवड, विहिरी, नाडेफ टाकी, रस्ते, क्रीडांगण, रस्ता खडीकरण, स्मशानभूमी शेड, पूर संरक्षण भिंत, सिमेंट काँक्रीट बांध अशी नव्याने कामे सुचवण्यात आली आहेत. त्यानुसार पुढील १० वर्षांसाठी मुळगाव गावचा १६ कोटी ७४लाख ५२ हजार व संभाव्य ३ लाख ९३ हजार ६०० मनुष्य दिन निर्मितीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ह्या साठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे काम करणाऱ्या सर्व घटकांचे ग्रामपंचायत मुळगाव यांनी आभार मानले.