सातारा .25.. ..राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेला आणि त्यांचे समाधी असलेल्या सज्जनगड शास्त्री आज माघ वद्य नवमीला म्हणजेच दास नवमीला 340 वा वा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात आणि विविध धार्मिक कार्यक्रम आणि संपन्न झाला .सज्जनगड येथील श्री समर्थ रामदास स्वामी संस्थान आणि श्री समर्थ सेवा मंडळ या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त गेले नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .महोत्सवाचा आजचा मुख्य दिवस असल्याने गडावर हजारो भाविकांनी दर्शनासाठी तसेच महाप्रसाद घेण्यासाठी गर्दी केली होती.पुण्यतिथी महोत्सवाचा आज मुख्य कार्यक्रम असल्याने पहाटे दोन वाजता काकड आरती होऊन चार वाजता श्री समर्थ रामदास स्वामींच्या समाधी ची महापूजा संस्थांचे अध्यक्ष श्री दुर्गा प्रसाद स्वामी व मानकरी यांच्या हस्ते करण्यात आली.दासनवमीनिमित्त समाधी मंदिरातील रामदास स्वामींच्या समाधीला विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती तसेच फुलांचे गजरे अतिशय सुरेख पुणे समाधीच्या वरील भागात सजावटी द्वारे गुंफण्यात आले होते. त्यानंतर पहाटे साडेसहा वाजता सांप्रदायिक भिक्षा होऊन सकाळी साडेदहा वाजता आरती आणि छबिना प्रदक्षिणा झाल्या. यामध्ये ..रामा रामा हो रामा ..म्हणत संस्थान ,समर्थ सेवा मंडळचे शेकडो समर्थ भक्तांनी समाधी मंदिराला 13 प्रदक्षिणा घालत राम नामाचा जयघोष ,उद्घोष करत ..समर्थ रामदास स्वामी महाराज की जय.. अशा मोठ्या घोषणा दिल्या .त्यानंतर दुपारी बारा वाजता अध्यात्म रामायण वाचन होऊन दासबोध आरती करण्यात आली. त्यानंतर समर्थांची निर्याण कथा सज्जनगड येथील सुरेश बुवा सोन्ना रामदासी यांनी वर्णन केली. दुपारी साडेबारा वाजल्यापासून महाप्रसादाच्या पंगतीला सुरुवात झाली. रात्री साडे नऊ ते अकरा या वेळेत डोकी गावच्या राघवेंद्र बुवा रामदासी यांच्या कीर्तनाने हा सोहळा संपन्न झाला. दिवसभर संपूर्ण राज्यातूनच नव्हे तर देशातून कोविड आजाराच्या नियमांना शिथिलता दिल्याने हजारो समर्थ भक्तांनी गडावर आगमन केले होते. गडावर भाविकांची गर्दी वाढू नये यासाठी सज्जनगड रोडवरील ज्ञानश्री इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट परिसरात वाहनांचे पार्किंग करण्यात आले होते. तेथून गडाच्या पायथ्यापर्यंत बस सेवेद्वारे भाविकांना ये-जा करता येत होती. खाजगी गाड्यांना वर येण्यास मनाई करण्यात आली होती. समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह योगेश बुवा रामदासी अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस, खजिनदार अरविंद बुवा अभ्यंकर तसेच कार्याध्यक्ष ॲड. डी. व्ही.देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ सेवा मंडळाच्या वतीने श्री राम भक्त निवास इथे महाप्रसादासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान सातारा येथील श्री समर्थ सदन सांस्कृतिक केंद्रात समर्थ सेवा मंडळाच्या वतीने दासबोध सामुदायिक पारायण संपन्न झाले, तसेच दासनवमीनिमित्त समर्थ सदन येथील श्री रामदास स्वामींच्या मूर्ती ची महापूजा समर्थभक्त बाळू बुवा कुलकर्णी यांनी केली होती. योगेश बुवा रामदासी यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ सदन येथे सातारा शहरातील शेकडो भाविकांनी रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी गर्दी केली होती .समर्थ सदन मध्ये यावेळी काढण्यात आलेली विविधरंगी रांगोळी समर्थ भक्तांचे आकर्षण ठरत होती .दासबोधातील अनेक लोकांचे वर्णन या रांगोळीत पाहताना समर्थभक्त आनंदून जात होते. बुंदी प्रसाद देऊन या सर्व भक्तांना प्रसाद वितरण करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजनासाठी समर्थ सदनचे व्यवस्थापक मुरलीधर उर्फ राजू कुलकर्णी , संचालक प्रवीण कुलकर्णी,अमोल शास्त्री बाळू बुवा कुलकर्णी, सौ .कल्पना ताडे, रवी बुवा आचार्य आदींनी परिश्रम घेतले .या दासनवमी महोत्सवाची सांगता शनिवारी 26 फेब्रुवारी रोजी पहाटे साडेसहा वाजता आरती व छबिना होऊन त्यानंतर सकाळी साडेसात वाजता राघवेंद्र बुवा रामदासी,ढोकी यांच्या लळीताच्या कीर्तनाने होणार आहे अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष व अधिकारी स्वामी श्री दुर्गा प्रसाद स्वामी यांनी दिली. सातारा येथील समर्थ सदन सांस्कृतिक केंद्रात समर्थ रामदास स्वामींची केलेली विशेष पूजा. तसेच समर्थ सदन येथील काढण्यात आलेली भव्य महारांगोळी .सज्जनगड येथील समर्थ समाधी ची विशेष पूजा आणि केलेली फुलांची तसेच गजर यांची आकर्षक आरास. सर्व फोटो ..अतुल देशपांडे, सातारा.