सातारा शहरातील कु.कश्मिरा पवार व गणेश गायकवाड यांचे विरूध्द, फिलीप जॅान भांबळ यांनी त्यांची, गोरख मरळ, अमरजित भोसले यांची समाजशास्त्रज्ञ व स्मार्ट व्हिलेज प्रोजेक्ट विजेत्या कु. कश्मिरा संदीप पवार यांनी पंतप्रधान कार्यालयात,त्यांना पंतप्रधान यांचे राष्ट्रीय सल्लागार म्हणून नियुक्तीचे बनावट पत्र दाखवून,लोकांना रोडचे, धान्याचे,कपड्याचे कॅान्ट्रॅक्ट बिहार नागालॅंड इ.,राज्यात विविध कामे मिळवून देतो असे बोलून सातारा, महाराष्ट्रातील अनेक लोकांकडून मोठा प्रमाणात पैसे घेऊन त्यांची फसवणूक केली या संदर्भात पोलीस अधिक्षक, साो, सातारा यांचेकडे दि.९/१२/२०२२ रोजी, ५०-५० लाख रूपयांच्या खंडणीच्या खटल्यातील व दुसऱ्या खंडणीच्या खटल्यातील फरार असलेला आरोपी फिलीप भांबळ यांने कश्मिरा पवार व गणेश गायकवाड यांचे विरूद्द तक्रार दाखल केली, त्याची चौकशी सातारा शहर पोलीसांनी त्वरीत सुरू केली व कश्मिरा पवार, गणेश गायकवाड यांचे राहते घराची, तसेच संगणक, लॅपटॅाप, मोबाईल यांची तपासणी करून, घरातील सर्व कागदपत्रे तपासून ताब्यात घेवून, पोलीस कर्मचारी श्री राहूल घाडगे यांनी ,दि ४/१/२०२३ रोजी सातारा शहर पो. ठाणे येथे भा.दं.वि.कलम १७० प्रमाणे अज्ञात इसमाचे विरूध्द गुन्हा दाखल केला.
सदर गुन्ह्याचे तपास कामी आरोपी कश्मिरा पवार, गणेश गायकवाड यांनी दिड वर्षे तपास कामी पोलीस ठाणे येथे जाऊन सहकार्य केले, सदर आरोपींना गुन्हा केले संदर्भात काहीही पुरावा नसल्याने त्यांना पोलीस अटक करत नव्हते, मात्र सदरचा तपास पोलीस बरोबर करत नाहीत , आरोपींना अटक का केली जात नाही म्हणून,फिलीप भांबळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन क्र.९९९३/२०२४ दाखल केले व त्या मध्ये तपास यंत्रणेवर गंभीर पण खोटे आरोप केले,सदर अर्जाचे दि. ९/५/२०२४ रोजीचे सुनावणीचे वेळी मुंबई उच्च न्यायालयाने कश्मिरा पवार यांचे नाव पिटीशन मध्ये का आणले असा प्रश्न विचारला फिलीप भांबळ यांचे वकिलांना केला पण त्याचे उत्तर देता आले नाही व मे.उच्च न्यायालायाने कश्मिरा पवार(आरोपी) यांचे वगळण्याचे आदेश फिलीप भांबळ यांचे वकिलांना दिले व पोलीस अधिक्षक,सातारा यांना केलेल्या तपासा बाबत म्हणणे दाखल करावयाचे आदेश दिले सदरचा आदेश पोलीसांना कळाले नंतर दि. १९/६/२०२४ रोजी पोलीसांनी कश्मिरा व गणेश या दोघांना फौ. प्र. सं. कलम ४१-अ प्रमाणे पॅन कार्ड हजर करणेची पुन्हा एक नोटीस देऊन पोलीस ठाण्यात बोलावले व भा.दं.वि. कलम ४२०, ४६५,४६८,४७१ प्रमाणे गुन्हा केला म्हणून कोणतीही अटकेची कल्पना न देता अटक केली.
दि १९/६/२०२४ रोजी सातारा शहर पो. स्टे चे निरिक्षक श्री म्हस्के यांनी पोलीस फौजफाटा घेऊन आरोपांची ७ दिवसांची कोठडी न्यायालयाकडे मागितली त्यास ॲड विकास पाटील -शिरगांवकर यांनी सक्त हरकत घेऊन सदरची मागणी कशी योग्य नाही, सुमारे दिड वर्ष या गुन्ह्याचा तपास पोलीस करत आहेत, दि ४/१/२०२३ रोजीची फिर्याद ही अटक आरोपीनी, बनावट कागदपत्र बनविली,फसवणुक केली याबाबतची पोलीसांचीच तक्रार नसताना अचानक कलमे कोणत्या पुराव्याचे आधारे वाढविली याचा खुलासा पोलीस करत नाहीत, असा युक्तिवाद केला,सदरकामी मे कोर्टाने आरोपींना १ दिवसाची कोठडी दिली,दि.२०/६/२०२४ रोजी पोलिसांनी पुन्हा ७ दिवसांची कोठडी मागितली परंतु न्यायालयाने ती मागणी फेटाळली व ॲड विकास पाटील-शिरगांवकर यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद केला व तो युक्तिवाद ऐकून न्यायालायाने आरोपीना जामीनावर खुले केले. सदरकामी ॲड विकास पाटील -शिरगांवकर यांनी तपास यंत्रणेतील चुका न्यायालाया समोर आणल्या.ॲड हर्षल शिर्के व करण निकम यांनी, त्यांना सहकार्य केले.
सदरकामी पोलीसांनी पुर्वीचा केलेला तपास कसा बरोबर आहे व दि १०/६/२०२४ नंतरचा तपास व आरोपीची अटक कशी चुकीची आहे, एकाच गुन्ह्यासाठी दोन गुन्हे कसे दाखल झाले यासंदर्भात ॲड.
विकास पाटील-शिरगांवकर यांचे पक्षकार उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.
दि २०/६/२०२४ रोजी रिमांडचे सुनावणीस वकील वर्ग,पोलीस मोठ्या संख्येने न्यायालयात उपस्थित होते व ॲड.विकास पाटील -शिरगांवकरांची मुद्देसुद मांडणी व युक्तिवादाची जोरदार चर्चा चालली होती.