शिरवळ शासकीय ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी यांच्या मनमानी(मुजोर) व भ्रष्टाचारी कारभाराबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन देण्यात आले. सदर प्रकरणाची चौकशी होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा, चौकशीत वैद्यकीय अधिकारी दोषी आढळल्यास त्यांना त्वरित निलंबित करा अशी मागणी करण्यात आली असून. जिल्ह्यातील कोणत्याही लो.ज.पा. कार्यकर्त्याचा अपमान झाल्यास सहन करणार नाही वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊ असा लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजयराव गायकवाड (काकासाहेब) यांनी इशारा दिला आहेसदरचे निवेदन महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष प्रियंकाताई भोसले व शिरवळ शहराध्यक्ष सीमाताई बनसोडे यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी युथ जिल्हा कार्याध्यक्ष करण गायकवाडयुथ जिल्हा उपाध्यक्ष रणजित कसबेयुथ तालुका सरचिटणीस मुनीर भाई शेखयुथ सातारा तालुका अध्यक्ष सुहास निंबाळकरदेवानंद भोसले अजीज पठाण शंभूराज भोसले व कार्यकर्ते उपस्थित होते.
| ReplyForward |




















