| प्रतिक आढाव भावी पिढीसाठी दिशादर्शक – सचिन मोरे फलटण – (प्रतिनिधी ) अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून, प्रसंगी बेरोजगारी चे काम करून पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करीत लक्ष साध्य करणारे प्रतिक आढाव हे उपेक्षित समाजातील भविष्यातील भावी पिढी साठी दिशादर्शक आहेत असे गौरवोद्गार धैर्य टाईम्स फाउंडेशन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती समिती पिंपरद चे अध्यक्ष सचिन मोरे यांनी काढले. ते पिंपरद (फलटण ) येथे नुकतेच राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेतून उत्तीर्ण होऊन नायब तहसीलदार पदी नियुक्त झालेले गुणवरे ता. फलटण येथील प्रतिक मुकेश आढाव यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते.यावेळी विदयुत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन सातारा विभागाचे मा. अध्यक्ष व विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार पतसंस्थाचे संचालक शरद मोरे, सुप्रसिद्ध अभिनेता रवींद्र पालखे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती पिंपरदचे सचिव विक्रांत बाजीराव मोरे, उपाध्यक्ष विकास संजय मोरे,खजिनदार इंद्रजित अरुण मोरे,सहसचिव विजय आण्णा बनसोडे, प्रसन्न साहेबराव मोरे,नीरज कांतीलाल मोरे, विकी शहाजी मोरे, तेजस कुमार मोरे, आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी नवनियुक्त नायब तहसीलदार प्रतिक आढाव यांच्याशी भविष्यातील योजनान विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना प्रतिक आढाव यांनी भविष्यात आपण समाजातील होतकरू मुलांना योग्य ते मार्गदर्शन व सहकार्य करणार असल्याचे सांगितले. | |