महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :फलटण
फलटण शहरात जर स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला तर त्याच कालावधीत त्याच पद्धतीने कोळकी ग्रामपंचायत हद्दीमध्ये बंद पाण्यात येणार आहे. तालुक्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुंडलिक नाळे आणि संजय देशमुख यांच्या पुढाकाराने गुरुवार दि.9 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणात कोळकी मधील सर्व हॉटेल व्यावसायिक, किराणा दुकानदार आणि अन्य व्यवसायिक यांची एक सभा बोलविण्यात आली होती.
ग्रामस्थांच्या वतीने बोलविण्यात आलेल्या सभेमध्ये वरील प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे. फलटणमध्ये एक-दोन दिवसात प्रमुख नेते आणि व्यापारी यांच्यामध्ये बैठक होऊन वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर स्वयंस्फूर्तीने फलटण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तो निर्णय जाहीर झाल्यानंतर त्याच पद्धतीने कोळकी येथे बंद पाळण्यात येणार आहे. कारण फलटण बंद झाल्यानंतर कोळकी बंद न ठेवल्यास फलटण येथील नागरिक दैनंदिन गरजेच्या वस्तूसाठी कोळकीमध्ये येतील आणि त्यामुळे त्याचा सर्वच लोकांना त्रास होणार आहे. तो होऊ नये म्हणून स्वयंस्फूर्तीने कोळकी बंद ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.त्याला उपस्थितांनी होकार दिला आहे. फलटणमध्ये बंद पाडण्याचा निर्णय न झाल्यास कोळकी ग्रामपंचायत हद्दीत सुद्धा बंद पाळला जाणार नाही असे यावेळी सांगण्यात आले. सुमारे सहा दिवस हा बंद पाळण्यात येणार असल्याचे. समजते
दरम्यान फलटण येथील व्यापारी संघटनेने 12 ते 17 सप्टेंबर दरम्यान फलटण शहर बंद ठेवण्याच्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासकीयस्तरावर त्याची गांभीर्याने दखल घेण्यात आलेली दिसत नाही. छोटे व्यावसायिक ,मोलमजुरी करणारे ,हातावर पोट असणारे या निर्णयाला विरोध करताना आढळतात.