योगेश धावडे व प्रकाश पोतदार यांचा समाज भूषण पुरस्काराने होणार सन्मान
कराड : मुंबई येथील मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने देण्यात येणारा “समाज भूषण पुरस्कार २०२२” साठी पाटण येथील योगेश धावडे व काले येथील प्रकाश अनंत पोतदार यांची निवड करण्यात आली आहे.अशी माहिती मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांनी दिली.
पुरस्कार वितरण सोहळा ४ जून रोजी सायं. ४ वा. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय डॉ. सुरेंद्र गावसकर सभागृह, दादर, मु्बई येथे होणार आहे. जेष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे, सुप्रसिद्ध कवी ए. के. शेख, साहित्यिक डॉ. लक्ष्मण शिवणेकर या प्रमुख अतिथीच्या हस्ते पुरस्कार वितरण प्रदान करण्यात येणार आहे.असेही मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांनी सांगितले.
योगेश धावडे यांनी पाटण तालुक्यातील बहुले (हावळेवाडी) या गावात सार्वजनिक कामात मोलाचे सहकार्य व मदत केली आहे. विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे मदत दिली आहे. समाजीक कार्यात अग्रेसर असून ग्रामपंचायतीकडून रस्त्याचे काम पुर्ण करुन घेतले आहे. बंधाऱ्यांची डागडुजी व गाळ काढणे, सिंचन प्रकल्प गावात यावा, जलसंवर्धन प्रकल्प राबविण्यात यावा, यासाठी प्रयत्न केले आहेत. ग्रामदैवत श्री निनाईदेवी मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी श्री निनाईदेवी देवस्थान ट्रस्टसाठी पुढाकार घेतला. आरोग्य केंद्र, दळणवळण याची व्यवस्था करून रोजगार उपलब्ध करून गोरगरिबांच्या हाताला काम मिळावे, यासाठी काम केले आहे. पूरग्रस्त सांगली जिल्ह्यातील भरतवाडी गावास लोकवर्गणीतून मदत केली. मुंबई जवळील आदिवासी भागात अनाथ आश्रमात जाऊन मदत केली आहे. दरवर्षी बहुले ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यात सहभाग घेऊन वारकऱ्यांच्या सेवेत सहभाग घेतात. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात काम सुरू आहे.
प्रकाश अनंत पोतदार हे काले. (ता. कराड) येथील रहिवाशी असून महाराष्ट्र पांचाळ सोनार समाज महामंडळाचे राज्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. कराड द. ता. सराफ सुवर्णकार अध्यक्ष, मतिमंद शाळा जुळेवाडी (ता. कराड) येथील मुलांना मदत केली आहे. मोही (ता. खानापूर) येथील निराधार वृद्धाश्रमातील लोकांची मोफत आरोग्य तपासणी करून ओषधे आणि जीवनावश्यक साहित्य वाट केले आहे. महापूरामुळे कोल्हापूर – बंगलोर हायवेवर शेकडो ट्रक चालक अडकून पडले होते. त्यांना नाष्ट, पाणी वाटप केले होते. काले येथील मुलींच्या शाळेसाठी संगणक दिला आहे. पुरामध्ये नुकसान झालेल्या सांगली, कोल्हापूर येथील समाज बंधूंना जागेवर जाऊन जीवनावश्यक वस्तू, ओषधे यांची मदत केली आहे.