विकास हेच ब्रीद मानणाऱ्या स्व प्रेमलाकाकी चव्हाण – अधिकराव चव्हाण (पपू शेठ)
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : कुंभारगाव माजी केंद्रीय मंत्री स्व. आनंदराव चव्हाण आणि माजी खासदार स्व. प्रेमलाकाकी चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त कुंभारगाव येथील श्री लक्ष्मीदेवी हायस्कुल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो तसेच यानिमित्ताने शाळेच्या आवारात वृक्षारोपण केले जाते तसेच स्व. प्रेमलाकाकी व स्व आनंदराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला जातो. हा कार्यक्रम दरवर्षी अधिकराव चव्हाण उर्फ पप्पू शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला जातो.
स्व. आनंदराव चव्हाण हे अत्यंत उच्च शिक्षित असले तरी त्यांनी सर्वसामान्य जनतेला कधी अंतर दिले नाही त्यांच्यामध्ये सतत रमणारे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. केंद्रीय मंत्री असताना त्यांनी आपल्या कौशल्याने देशासाठी धोरनात्मक निर्णय घेतले. पं जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री व इंदिरा गांधी यांच्या मंत्रीमंडळात अत्यंत कार्यक्षम मंत्री अशी स्व आनंदराव चव्हाण यांची ओळख होती. त्याचपद्धतीने कार्यशैली असलेल्या त्यांच्या पत्नी स्व. माजी खासदार प्रेमलाकाकी चव्हाण लोकनेत्या होत्या. इंदिराजी गांधी यांच्या अत्यंत विश्वासू असणाऱ्या प्रेमलाकाकी पक्षाचा आदेश कायमच अग्रस्थानी मानला व पक्ष संघटना राज्यभर वाढविली. असे प्रतिपादन यावेळी अधिकराव उर्फ पप्पू शेठ चव्हाण यांनी केले.