नवारस्ता प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत तालुका कृषी अधिकारी पाटण कार्यालयाच्या वतीने सोमवार दि 30 मे रोजी म्हावशी तारळे चाफळ या ठिकाणी पाटण तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादकता वाढीसाठी प्रशिक्षण आयोजित केल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सुनिल ताकटे यांनी दिली.
राज्यामध्ये सोयाबीनचे अधिकतम उत्पादन घेणारे (एकरी 25 क्विंटल) अंकलखोप जिल्हा सांगलीचे प्रगतशील शेतकरी प्रशांत पाटील यांचे प्रत्यक्ष स्वतःच्या अनुभवावर आधारित मार्गदर्शनपर शेतकरी प्रशिक्षण पाटण तालुक्यात विविध ठिकाणी आयोजित केले आहे.यामधे सोमवारी सकाळी दहा वाजता म्हावशी येथे दुपारी 1:30 वा तारळे व सायंकाळी 4:00 वा चाफळ या ठिकाणी आयोजित केले आहे तरी पाटण तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सदर प्रशिक्षणास उपस्थित रहावे व आपले सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन कृषी अधिकारी सुनिल ताकटे यांनी केले आहे.