राज्यातील ग्रामीण व शहरी भागात संघटनेत काम करणार्या प्रत्येक पत्रकाराला व वृत्तपत्राशी संबंधीत प्रत्येक घटकाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम
बनविण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने नेहमीच आग्रही भूमिका घेतलेली आहे. याच माध्यमातून संघाने पत्रकार संरक्षण कायद्यासाठी दिलेल्या लढ्याला यश मिळून पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आला. तसेच पत्रकारांसाठी ‘बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना’शासनाने जाहीर केली हे देखील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने केलेल्या पाठपुराव्याला आलेले यश असून यामागे संघाचे राज्य संघटक संजय भोकरे साहेब यांचे असणारे मार्गदर्शन आणि प्रेरणा महत्वाची ठरली. भोकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त संघाच्या माध्यमातून त्यांनी केलेला कार्याचा हा आढावा..
राज्यातील बहुसंख्य वृत्तपत्रांचे संपादक तसेच पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाशी जोडले गेले आहेत.राज्यातील कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, नागपूर, पश्चिम महाराष्ट, गोवा, बेळगाव या भागात संघटनेने सभासदांच्या विविध प्रश्नांवर मोर्चे, आंदोलने उभारुन हा पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आणण्याच्या दृष्टीने स्वतंत्र लढा दिला.
विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर, माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री राधाकृष्ण विखे, ना. धनंजय मुंडे, माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी मंत्री रामदास कदम, माजी मंत्री पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर, माजी मंत्री विष्णू सावरा, माजी मंत्री ना. दिवाकर रावते, यांसह राज्य मंत्री मंडळातील डझणभर मंत्र्यांकडे या कायद्यासाठी राज्य पत्रकार संघाने पाठपुरावा केला होता. संघटनेने तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्र पवार व माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना निवेदन देऊन हा कायदा राज्य शासनास अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे हा कायदा अंमलात येणे शक्य झाले.
संघाचे मार्गदर्शक संजय भोकरे यांनी सांगली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालिन केंद्रीय संरक्षण मंत्री मोहन पर्रिकर, आसामचे राज्यपाल राम नाईक या सारख्या नेत्यांना आमंत्रीत करुन राज्य मराठी पत्रकार संघाची भूमिका सातत्याने स्पष्ट करत पत्रकारांच्या न्याय्य मागण्यांसाठी पाठपुरावा केला आहे. त्यांच्याच पुढाकारातून सांगली, सोलापूर, कोहापूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद या ठिकाणी पत्रकार भवन उभारण्यात आले आहे. याबरोबरच देशाच्या राजधानीतही पत्रकार भवन उभारले आहे.
पत्रकारांच्या पाल्यांना शिक्षणात सवलती मिळाव्यात, उच्च शिक्षणातही सवलती मिळाव्यात तसेचराज्य मराठी पत्रकार संघाचा विस्तार विविध राज्यात करण्यासाठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे प्रयत्नशील आहेत. सभासदांना संघटनेमार्फत पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण, शासकीय विश्रामगृहांवर प्राधान्यक्रम, टोलनाके, सभासदांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी राखीवकोटा ठेवण्यासाठी संघप्रयत्नशील आहे. अधिस्वीकृती धारकांनाच राज्य शासनाच्या मोफत रेल्वे, एस. टी., एअरलाईन, शासकीय विश्रामगृहांवर प्राधान्य दिले जाते त्यामुळे ग्रामीण भागातील पत्रकारांवर अन्याय होतो. त्यामुळे ग्रामीण भागातील पत्रकारांनाही या सवलती मिळाव्यात अशी संघाची भूमिका असून त्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आरोग्य, विमा संरक्षण व मोफत प्रवास या तीन मुद्द्यांवर केंद्र व राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला असून ग्रामीण पत्रकारांना या सवलतींचा फायदा देण्याचा प्रयत्न संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.
संघाचे सांगली, मिरज याठिकाणी शैक्षणिक उपक्रम सुरु असून पुणे जिल्ह्यातही असे उपक्रम सुरु करण्याचा मानस आहे. ग्रामीण भागास वर्तमान पत्रातील श्रमिक पत्रकार, मुक्त पत्रकार, छायाचित्रकार यांच्या संरक्षणासाठी व लढ्यासाठी संघाने नेहमीच मदतीचा हातपुढे केला आहे. बाळशास्त्री जांभेकरसन्मान योजनेच्या निमित्ताने या लढ्याला काहीसे यश मिळाले आहे. मात्र इतरही लाभ पत्रकारांना मिळवून देण्याचा संघटनेचा आणि भोकरे साहेबांचा प्रयत्न आहे. संघाच्या वतीने तब्बल 15 राज्यस्तरीय अधिवेशने घेण्यात आली आहे. या दरवर्षी घेतल्या जाणार्या राज्यस्तरीय अधिवेशनात पत्रकारांच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करुन मागण्यांचे ठराव शासनाकडे पाठवून त्या पूर्ण होण्याच्या दृष्टीने सातत्याने पाठपुरावा केला जातो. या अधिवेशनाच्या माध्यमातूनही पत्रकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्धहोते.
संघटनेमार्फत विभागनिहाय अधिवेशने, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, पत्रकार दिन, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव व पाठीवर शाबासकीची थाप देण्याचे काम पत्रकार संघाच्या माध्यमातून सुरुआहे. संघाने दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांनाही आर्थिक मदतीचा हातभार लावला आहे. सध्याच्या राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने मा. संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गरजुंपर्यंत मदत पोहचविली आहे. त्याचबरोबर पत्रकारांना किराणा साहित्य घरपोहच केले. सॅनिटायझर व मास्क वाटपही करण्यात आले. तसेच या कालावधीत अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक औषधांचे वाटपही करण्यात आले. कोरोनाने मृत्यू झालेल्या चार पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचे कामही पत्रकार संघाने केले. तसेच उपचारासाठी देखील मदत दिली जात आहे. त्याचबरोबर कोरोना कालावधीत कार्यरत असणार्या शासकीय अधिकारी व काही पदाधिकार्यांचा संघाच्या वतीने कोरोना योध्दा म्हणून सन्मान करण्यात येत आहे.
संघामार्फत स्व. जवाहरलाल दर्डा जीवन गौरव पुरस्काराने दैनिक पुण्यनगरीचे मालक संपादक स्व. मुरलीधर शिंगोटे यांना सन्मानित करण्यात आले. सांस्कृतिक, पत्रकारीता, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कार्य करणार्या व्यक्तींना व संस्थांचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. पत्रकार संघाच्या वतीने बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे तसेच केसरी विजेता मल्ल हर्षल सदगीर यांचा देखील सन्मान करण्यात आला आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार यांना एक लाख रुपये रोख स्वरुप असलेला जीवनगौरव पुरस्कार, अनंत दिक्षीत, मकरंद अनासपुरे, जॉकी श्रॉफ, मधु कांबीकर, अजिंक्य देव,सयाजीशिंदे, शिवाजीसाटम, संतोषजुवेकर, विक्रम गोखले, सचिन पिळगावकर, विजय कदम, दिपालीसय्यद, क्रिकेटर अजिंक्य रहाणे, झहिर खान, रामदेव बाबा, श्री.श्री. रविशंकर, स्वामी समर्थ गुरुकुलपीठाचे चंद्रकांत मोरे, इत्यादी मान्यवरांना सन्मानित करण्यात आले आहे.
पत्रकार संघाच्या माध्यमातुन दरवर्षी मोफत शालेय साहित्य, अंध अपंगांना मोफत सायकल वाटप करण्यात येते. पुणे येथे सकाळच्या बस डे उपक्रमाला 51 हजार रुपये पत्रकार जोतीर मिड्उे कुटूंबीयाला 51 हजार, नागपूर येथील पत्रकारास उपचारासाठी 51 हजार, ठाणे येथील कॅन्सरग्रस्त पत्रकारास 25 हजार तसेच वर्षभरातील सामाजिक धार्मिक कार्यक्रमासाठी संघटनेने देणगी दिली आहे. भोकरे साहेबांच्या संकल्पनेतून पत्रकार संघाने नाविण्यपूर्ण उपक्रम राबवत राज्यभरातील पत्रकारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मोफत हेल्मेटवाटप केले. त्याचबरोबर केवळ पत्रकारांसाठी काम करणारीही संघटना नाहीतर समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देणारी संघटना आहे. आषाढीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या वारकर्यांचे पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी संघटनेने हजारो वारकर्यांना संघटनेमार्फत रेनकोटचे वाटप करुन त्यांची अध्यात्मिक वारी सुकर केली.
संजय भोकरे साहेबांचे कार्य हे पत्रकार संघापुरते मर्यादीत नसून आपल्या सांगली येथीलश्रीअंबाबाई तालीम संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांनी शासनाचा छत्रपती क्रीडा पुरस्कार मिळविला आहे. ‘वस्ताद’ म्हणून ओळखले जाणार्या भोकरे साहेबांनी तालीम संस्थेच्या माध्यमातून अनेक मल्लांना घडवले आहे.
संपूर्ण राज्यभरातपत्रकारांची मोट बांधण्यासाठी राज्य संघटक संजय भोकरे यांच्याकल्पक नेतृत्वातून संघटनेचा विस्तार राज्याच्या पलिकडे जाऊन ‘ऑल इंडिया जर्नालिस्ट’ची स्थापना करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथे भव्य दिव्य इमारतीत हे कार्यालय सुरु करण्यात आले आहे. संजय भोकरे यांचे नेतृत्व राज्यभरातील पत्रकारांसाठी प्रेरणादायीआहे, असेच म्हणावे लागेल.