महाराष्ट्र न्यूज वाई प्रतिनिधी…
आमदार मकरंद पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांचे कट्टर समर्थक भुईंज येथील युवा नेते व सर्वांना नेहमीच मदत करणारे समाजकार्यात अग्रेसर असणारे आपल्या मनमिळावू स्वभावाने लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपलेसे वाटणारे सुधीर भोसले यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांकडून उत्साहात साजरा करण्यात आला गेली दोन वर्ष कोरोना महामारी मुळे आबांनी आपला वाढदिवस साजरा न करता अनेक गोरगरीब लोकांना मदतीचा हात दिला. राजकारणामध्ये सुधीर आबा हे आमदार मकरंद आबा यांच्या बरोबरीने काम करत आहेतच त्यांच्या पत्नी वाई पंचायत समितीच्या सभापती असताना सुधीर आबांनि पंचायत समितीच्या सर्व योजना संपूर्ण तालुक्यातील तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम हिरिरीने केले. भुईंज सारख्या मोठ्या गावात सुधीर आबांनी काम करत असताना कधीही गटातटाचा विचार न करता सर्वसामान्य लोकांची कामे झाली पाहिजेत एवढाच विचार नेहमी केला व आलेल्या प्रत्येक माणसाला त्याचे काम होईपर्यंत साथ दिली. सुधीर आबा समाजकारणातही मागे नाहीत हेही सुधीर आबांनी कोरोना काळात लोकांना दाखवून दिले सुधीर आबा हे आपल्या मित्रपरिवारा बरोबरच सर्वसामान्य लोकांनाही आपलेसे वाटतात. वाढदिवसाच्या दिवशी सकाळी त्यांचे घरातील मंडळींनी औक्षण केल्यानंतर त्यांनी भुईंज येथील ग्रामदैवताचे दर्शन घेऊन आपले घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात केली. भोसले मित्र परिवाराकडून पाचवड येथील आपुलकी गतिमंद शाळेतील मुलांना खाऊवाटप करण्यात आला तसेच वेळे येथील यशोधन आश्रमामध्ये वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर सर्व कार्यकर्ते मित्र परिवार यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या सुधीर आबा यांना आमदार मकरंद (आबा) पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, माजी सभापती प्रमोद दादा शिंदे व इतर नेतेमंडळी मित्रपरिवार यांनी फोन वरून व प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्या निमित्ताने नेतेमंडळी व वाई तालुक्यातील कार्यकर्ते यांनी दिलेल्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार करतो व या शुभेच्छांच्या जोरावर इथून पुढच्या काळात सामाजिक व राजकीय क्षेत्रात वाटचाल करण्यास बळ मिळेल असे सुधीर भोसले यांनी सांगितले.