संपूर्ण कार्यालयातील कर्मचार्यांची कोरोना चाचणी सूरू
कराड : कोरोनाचा वाढता संसर्ग शहरात दिसू लागला असुन गेल्या चार दिवसात मोठ्या संख्येने बाधित आढळून आले आहेत. यामध्ये कराडचे तहसीलदार विजय पवार यांचा ही कोरोना अहवाल बाधित आल्याने प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालयात सर्वांची चांगलीच धावपळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरी आरोग्य केंद्राच्या वतीने आज कार्यालयातील सर्व कर्मचारी, अधिकारी यांची कोरोना चाचणी करण्यास सुरुवात करण्यात आला आहे.
सध्या शहरात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निर्बंध लावले असून नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना नगरपालिका, पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
कराडचे तहसीलदार विजय पवार यांचा काल कोरोना अहवाल बाधित आल्याने त्यांनी तात्काळ उपचार सुरू केले असून तहसील कार्यालय तसेच तालुक्यातील नागरिकांनी कोरोना नियमांचे व प्रशासनाच्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करावे, आरोग्याबाबत थोडी जरी शंका आल्यास संबंधितांनी तात्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावे व प्रशासनाचे नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार विजय पवार यांनी महिती दिली.






















