महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी(कळंब – इंदापूर) : शहाजीराजे भोसले
रेडणी व परिसरातील गावात सोमवारी रात्रभर जोरदार पाऊस झाला,या पावसामुळे ताली तुडुंब भरल्या आहेत,या भागातील बहुतेक शेतकऱ्यांचे शेतातील बांध,ताली या पावसाच्या जोरामुळे फुटून गेल्या आहेत,त्यामुळे प्रचंड नुकसान जमिनीचे झाले आहे,शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके वाहून गेली आहेत, अनेक पिके पाण्याखाली आहेत,तर जुलै पासून सतत पडणाऱ्या पावसामुळे उभी पिके कुजून जाऊ लागली आहेत,बाजरी,मका या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले
आहे,डाळिंब,संत्रा,मोसंबी या पिकांचे फळझोड होऊन नुकसान झाले आहे,गावागावातुन ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत,गाव तलाव भरून झाले आहे,ते भरल्याने सांडव्यावाटे पाणी बाहेर वेगात पडत आहेशेतात सतत पाणी साचत असल्याने व त्याचा निचरा होत नसल्याने शेतजमीन आता तग धरू शकत नाही,शेतजमिनी चा पोत खालावला आहे,अश्या प्रचंड आर्थिक नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाला आहे,रेडणी,रेडा,शहाजीनगर, लाखेवाडी, खोरोची, काटी,वरकुटे या गावातील शेतकरी चिंतेत आहेत.पावसाने उघडीप द्यावी,अशी आशा आता शेतकऱ्यांची आहे.