सातारा : सातारा जिल्हयातील नूतन पोलीस अधीक्षक व गडचिरोलीचे तत्कालीन सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांना ‘केंद्रीय गृह मंत्र्याचे २०२२ चे विशेष ऑपरेशन पदक’ जाहीर झाले आहे.देशभरातील अनेक पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना हे पदक जाहीर झाले असून, महाराष्ट्रातील दोन पोलीस अधीक्षकांसह एकूण ११ जणांचा समावेश आहे.सातारा येथील एसपी समीर शेख यांची गेल्याच आठवड्यात गडचिरोली येथून साताऱ्यात बदली झाली आहे.