कराड वरिष्ठ पोलीस निरीक्षक
बी. आर. पाटील यांची पोलीस उपअधिक्षकपदी पदोन्नती
कराड येथील शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना पोलीस उपअधिक्षकपदी पदोन्नती मिळाली. आज सायंकाळी पोलीस महासंचालक कार्यालयाकडून पोलीस उपअधिक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर नियमित पदोन्नतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली असून राज्यातील 175 अधिकार्यांचा यामध्ये समावेश आहे. येथील शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बी. आर. पाटील हे कार्यरत असून यापूर्वी त्यांनी मुंबई, कोल्हापूर, सातारा, कराड, लोणावळा, तसेच क्राईम ब्रँच मुंबई येथेही सेवा बजावली आहे. कराड येथील त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक मोठ्या गुन्ह्यांची उखल होण्याबरोबरच अटल गुन्हेगारांना त्यांनी गजाआड केले आहे. व कराडमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी नेहमीच मोलाचे
काम केले आहे व
बी. आर. पाटील यांच्या या पदोन्नती बद्दल त्यांचे कराड शहरातुन व विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे.