——————————————————————येथील शेतकरी संमती देत नाहीत तोपर्यंत एकही इंच जमीन एमआयडीसीला घेऊन देणार नाही————————————————-पिंपोडे बुद्रुक,-प्रतिनिधी-तेजस लेंभे
इतके वर्षे मंत्री असलेल्यांना या भागात पाणी पोचवता आले नाही. ही गेंड्याच्या कातडीची पुढारी नावाची जात पैदा करण्याचं पाप येथील जनतेचे आहे. जो कामाचा नाही त्याला बदला. पाचदहा वर्षे ठीक आहे पण काम होत नसेल तर बदला आणि एखाद्या शेतकऱ्याच्या पोराला आमदार होऊ द्या. उत्तर कोरेगाव मधील शेतकरी संमती देत नाहीत तोपर्यंत एकही इंच जमीन एमआयडीसीला घेऊन देणार नाही असे, मत आ.जयकुमार गोरे यांनी सोळशी ता.कोरेगाव येथे एमआयडीसी विरोधी संघर्ष समिती उत्तर कोरेगाव यांच्यावतीने भागांतील शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी आ.गोरे यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली. मी दुष्काळी भागातील लोकप्रतिनिधी आहे. डिसेंबर महिना आला की टँकरने पाणी पुरवठा करावा लागायचा. टँकरच्या खेपा वाढवा, यासाठी दररोज लोकांची माझ्याकडे गर्दी असायची. १०५ पैकी ८० गावात डांबर नव्हतं. तुळशीच्या लग्नाला ऊस मिळत नव्हता. अशा तालुक्यात माझा जन्म झाला. २००९ साली क्रांती झाली आणि माण-खटावच्या जनतेने शेतकऱ्याच्या पोराला आमदार केलं. जेथे पूजेला ऊस मिळत नव्हता तिथे आज चार साखर कारखाने चालू आहेत आणि पाचव्याचं काम चालू आहे. आता उसाला तोड आली नाही म्हणून माझ्याकडे गर्दी होते. मी अजून मंत्री झालो नाही. १२ वर्षात १२० गावांना कॅनलने पाणी नेले. अजून पाच वर्षात माण खटावला दुष्काळी म्हणायची कोणाची हिंमत होणार नाही. १२ वर्षात २७०० कोटी रुपये पाणी योजनेवर खर्च केलेत.मला चॅलेंज घेऊन काम करायला आवडतं. माझ्याकडे गमावण्यासारखं काही नाही. नंगे को खुदा भी डरता है. जिथं सामान्य माणसावर अन्याय होतो तिथं मी पुढे आहे. शरद पवारांनी नांदवळच्या लोकांचं ऐकून घ्यावे. पाणी आलं पाहिजे म्हणून बैठका घ्या. सोळशी खोऱ्यात धरण झालं तर आठ टीएमसी पाणी मिळेल. आता तुमची दोन चार वर्षे राहिली आहेत. आमची तुमची लढाई हा विषय घेऊ नका जी गोष्ट लोकांना पाहिजे ती त्यांच्या मर्जीने करा. जर लोकांच्या केसाला धक्का लागला तर ठोकिण. सोडणार नाय. आम्ही जनतेच्या भूमिकेसोबत आहोत. यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मॅनेज केलं.म्हसवडला पाणी आणि रस्ता नसल्याबाबत रिपोर्ट तयार केला आणि उत्तर कोरेगावला एमआयडीसी करायचा प्रयत्न चालवलाय. आमच्याकडे उरमोडीचे पाणी असून प्रस्तावित एमआयडीसीच्या मधून हायवे गेलाय. जिल्हाधिकाऱ्यांनी सुध्दा येथे जमीन घेतली. त्यांचीदेखील चौकशी लावणार आहे. तुमच्या अन् माझ्या एमआयडीसीचा विषयच नाही. आमची एमआयडीसी रद्द झालेली नाही. आमच्याकडे माळरान आहे. नापीक जमिनीवर प्रकल्प उभारला जाणार आहे. इथे जर तुम्हाला एमआयडीसी पाहिजे असेल तर तुमच्यासोबत मी आहे. जर लोकांना नको असेल तर यांना काय पडलय. एवढं कमवून ठेवलंय पण मागे पुढे कोणी नाही. राम नावाला कलंक आहे. म्हसवडला एमआयडीसी झाली पाहिजे ही माझी लढाई आहे. त्यांनी कितीही ताकद लावली तरी ती एमआयडीसी इकडे येणारच नाही. जोपर्यंत येथील शेतकरी संमती देत नाहीत तोपर्यंत एकही इंच जमीन एमआयडीसीला घेऊन देणार नाही. त्यांना जी भाषा कळते त्याच भाषेत मी बोलतो लोकांना धमकावून काही मिळणार नाही सुपीक, बागायती जमिनी द्यायला लोकांचा विरोध आहे. कसंही वागलो तरी लोक मतं देतात त्यामुळे हा लोकांचा दोष आहे. आता रडायचे बंद करून लढायला शिका. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले ते कृष्णा खोऱ्यावर २० वर्षे होते जिथे सही करतील तिथे पाणी आणण्याची ताकद त्यांच्याकडे होती तरीही या भागावर अन्याय केला . लाल दिव्याचा वापर करून गाजर दाखवून लोकांच्या टाळू वरच लोणी खायचं काम त्यांनी केलं त्यांच्या मनात असते तर प्रत्येक शिवारात पाणी पोचलं असतं त्यावेळी लोकांचा विचार केला नाही आता स्वतःची जमीन चार पटीने विकायची असल्याने त्यांना जनता आठवली. काही लोकांना एमआयडीसी हवी त्यांनी जिरायत क्षेत्र दाखवून लोकांना एकत्र केलं तर तिथे मी एमआयडीसी करून देईन मिनी एमआयडीसी करु. एमआयडीसी करावी या विचाराचा मी पण आहे पण त्याकरिता खडकाळ, मुरमाड जमीन हवी बागायत भागात एमआयडीसी नको सोनं पिकवणारी जमीन द्यायला लोकं तयार नाहीत. म्हणून तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून संघर्ष करायला आम्ही तयार आहे त्यामुळे घाबरायचं कारण नाही ते म्हणाले तुमच्याकडे ईडी आहे तर आमच्याकडे शिडी आहे शिडी असेल तर लावा आणि नाचत बसा शिड्या खिश्यात ठेवू नका वाजवा आम्हाला पण ऐकू द्या.———————————————-
एमआयडीसी होण्यासंदर्भात भागांतील समर्थनार्थ शेतकऱ्यांनी खासदार निंबाळकर आणि आ.गोरेना दिले निवेदन…. भागांतील शेतकऱ्यांच्या सहमतीने कोरेगाव भागांत महत्वाकांक्षी NICDC प्रकल्प होत आहे. अनेक बेरोजगारीचा प्रश्न सुटणार आहे. अशा आशयाचे पत्र यावेळी सोळशी,नायगांव, रणदुल्लाबाद, नांदवळ,पिंपोडे बुद्रुक गावांतील एमआयडीसी कोरेडोर समर्थनार्थ असणाऱ्या शेतकरी व कार्यकर्त्यांनी खा.रणजितसिंह निंबाळकर व आ.जयकुमार गोरे यांना सोळशी येथे प्रत्यक्ष भेटून भागात एमआयडीसी होण्यासंदर्भाचे निवेदन दिले…..






















