कराड : कराड येथील प्रशासकीय इमारत व विश्रामगृहाचे काम पूर्ण होऊन दोन वर्षांचा काळ लोटला आहे. तरीही अद्याप त्याचे लोकार्पण झाले नव्हते. शिवसेना कराड तालुक्याच्या वतिने तालुकाप्रमुख काकासाहेब यांनी अलिकडेच मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे उद्घाटन करण्यासाठी कराड भेटीचे आमंत्रण दिले होते. त्यावेळी मुख्यमंत्री साहेबांनी लवकरच कराडला भेट देऊन उद्घाटन करणार असल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे शुक्रवार दि. २५ नोहेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विश्रामगृहासह विविध उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडणार असून “बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा मेळावा होणार आहे. तसेच यावेळी दिग्गज नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचेही काकासाहेब जाधव यांनी सांगितले.