सातारा : माझे कुटुंब माझी जबाबदारी या महत्त्वाच्या उपक्रमाअंतर्गत आरोग्य पथकाला नागरिकांनी कोणतीही माहिती न लपवता आडपडदा न ठेवता मनमोकळेपणाने सांगावी म्हणजे कोरोनावर मात करणे अधिक सुलभ जाईल असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठल्ये यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे शासनातर्फे माझे कुटुंब माझी जबाबदारी ही अत्यंत महत्वाची मोहीम राबवली जात आहे त्या पार्श्वभूमीवर या पत्रकातून डॉक्टर आठल्ये यांनी समाजाला आवाहन केले आहे प्राथमिक शिक्षक आरोग्य सेवक आरोग्य सेविका अंगणवाडी सेविका आशाताई इतर कर्मचारी अशा घटकांचा समावेश असलेले पथक घरोघरी जाऊन सर्वे करीत आहे ऑक्सीजन पातळि तसेच तापमानाची पाहणी करत करत आहे तसेच आस्थेवाईकपणे चौकशी केली जात आहे या सर्व प्रणालीमुळे आणि माहितीमुळे जास्तीत जास्त गरजू नागरिकांपर्यंत पोहोचणे सोपे होत आहे असे नमूद करून पत्रकात पुढे म्हटले आहे की या आरोग्य पथकाला पूर्ण सहकार्य करावे हे पथक आपल्या सुरक्षिततेसाठी आहे.
सर्व माहिती गोपनीय ठेवली जाते याबाबत नागरिकांनी निश्चिंत असावे सातारा जिल्ह्याचा कोरोना मुक्तीचादर 76 टक्क्यांवर पोहोचला आहे नागरिकांचे प्रशासनाला चांगले सहकार्य आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम जिल्हाधिकारी शेखर सिंह तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी ठरत आहे नागरिकांनी असाच प्रतिसाद द्यावा आणि संपूर्ण माहिती पथकाला कोणताही संकोच न बाळगता द्यावी असे देखील पत्रकात आवाहन करण्यात आले आहे






















