साखरवाडी: निंभोरे तालुका फलटण गावच्या सरपंच कांचन निंबाळकर यांच्याविरोधात इतर सदस्यांनी मनमानी कारभार करीत असून ग्रामपंचायत सदस्यांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचे तसेच कोणत्याही कामात सदस्यांना विचारात न घेता कामे करीत असल्याच्या मुद्द्यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची मागणी केली होती तो अविश्वास ठराव 6 विरुद्ध 3 अशा मताधिक्याने त्यांनी जिंकला व लगेचच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची कारखाना कार्यस्थळावर जाऊन भेट घेत अधिकृत भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याची घोषणा केली.शुक्रवार दि 3 मार्च रोजी दुपारी 3 वाजता तहसीलदार समीर यादव यांच्या अध्यक्षतेखाली निंभोरे ग्रामपंचायतच्या कार्यालयात सर्व सदस्यांच्याची विशेष सभा घेण्यात आली त्यावेळी अविश्वास ठरावाबाबत गुप्त मतदान घेण्यात आले. त्यामध्ये सर्व 9 सदस्यांनी मतदान केले त्यामध्ये अविश्वास ठरावाच्या बाजूने 3 तर सरपंच यांच्याबाजूने 6 असे मतदान झाल्याने विश्वास ठराव फेटाळला असल्याची माहिती तहसीलदार समीर यादव यांनी दिली यावेळी या मतदान प्रक्रियेमध्ये मंडलाधिकारी जोशी, ग्रामसेवक एम यु शेलार, सहाय्यक पोलीस फौजदार विलास यादव उपस्थित होते
अविश्वास ठराव फेटाळला गेल्याचे जाहीर होताच सरपंच कांचन निंबाळकर, ह भ प हनुमंत महाराज रणवरे व इतर कार्यकर्त्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची भेट घेऊन भाजपमध्येजाहीर प्रवेश असल्याचे सांगितले यावेळी त्यांच्याबरोबर ग्रामपंचायत सदस्य सचिन कांबळे, सुरेखा कांबळे, माजी उपसरपंच जयश्री मोरे, मुकुंदराव रणवरे, रामचंद्र अडसूळ, शामराव कांबळे, धीरज कांबळे, बाळासो मोहिते, अमित रणवरे उपस्थित होते. सरपंच कांचन निंबाळकर यांच्या भाजप प्रवेश बद्दल तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य धनंजय साळुंखे पाटील, जिजामाला नाईक निंबाळकर, समशेर सिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.