महिन्यातील चार दिवस हजेरी लावून महिन्याचा पगार कसा?
दहिवडी : ता.३० माण तालुक्यातील गोंदवले खुर्द ग्रामीण रुग्णालयातील अधीक्षक हे कधीही कामाच्या वेळेवर हजर राहत नसून स्वतःच्या मनानुसार कधीही कामावर येतात आणि कधीही जातात. सरकारी दवाखान्यातील कामापेक्षा स्वतःच्या खाजगी दवाखान्यामध्ये काम करत बसत असून याकडे जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांनी लक्ष कधी देणार असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. या ग्रामीण रुग्णालयातील अधीक्षक यांचे लक्ष नसल्यामुळे कर्मचारी सुस्त आहेत. त्यामुळे येणाऱ्या पेशंटची आरोग्य तपासणी सुद्धा व्यवस्थित केली जात नाही. त्या ठिकाणी असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्वसामान्य जनतेला डॉक्टरांची वाट बघत बसावे लागत आहे. तर किरकोळ औषधोपचार करून येणाऱ्या लोकांना कर्मचारी माघारी पाठवले जात आहे. त्यामुळे रुग्णांना उपचाराचे निदान न होता नुसते हेलपाटे मारायला लागत आहेत. या ग्रामीण रुग्णालयातील काम करणाऱ्या अधीक्षक यांच्या मनमानी कारभारावर जिल्हा सिव्हिल सर्जन यांनी लक्ष घालून कारवाई केली जावी अशी सर्वसामान्य जनतेतून मागणी होत आहे.
माण तालुक्यातील गोंदवले खुर्द ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक यांच्या मनमानी कारभाराकडे जिल्हा सिव्हिल सर्जनचे दुर्लक्ष का? या प्रकरणाकडे वरिष्ठांनी लक्ष घालून त्यांच्यावर योग्यरित्या कारवाई करण्याची मागणी होते आहे. महिन्यातील चार दिवस भरून महिन्याचा पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? असा सवाल जनतेला पडला आहे.