सातारा, दि. २४ मार्च : उन्हामुळे द्राक्षांची गोडी वाढली असून आंबट गोड रसाळ द्राक्षांचा हंगाम अखेरच्या टप्प्यात आला आहे. द्राक्षांचे दर सामान्यांच्या आवाक्यात आले असून पुढील महिनाभर द्राक्षांची गोडी चाखता येणार आहे. किरकोळ बाजारात एक किलो द्राक्षांची प्रतवारीनुसार ५० ते १०० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.
उन्हाचा तडाखा वाढल्याने द्राक्षांची गोडी वाढली असून प्रतवारीही चांगली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात द्राक्षांची आवक सुरू होते. १५ एप्रिलपर्यंत द्राक्षांचा हंगाम सुरू असतो.
बाजारात आंब्यांची आवक वाढल्यानंतर द्राक्षांची आवक कमी होत जाते. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात द्राक्षांची लागवड चांगली झाली होती तसेच द्राक्षांचा मागणीही राहिली. द्राक्षांचे दर सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. द्राक्षांना चांगले दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले, मध्यंतरी झालेल्या हवामान बदलामुळे द्राक्षांच्या गोडीवर परिणाम झाला होता. उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर द्राक्षांची गोडी वाढली असून द्राक्षांची प्रतवारीही चांगली आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीपर्यंत द्राक्षांची आवक सुरू राहील.