
याबाबत अधिक माहिती अशी, जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी मूळ ५० केंद्रावर आणि २२२ उपकेंद्रावर एकूण ३७ हजार ५०८ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. त्यामध्ये मूळ केंद्रासाठी ५० मुख्य केंद्रसंचालक, उपकेंद्रासाठी २२२ उपकेंद्र संचालक, १५०० परिवेक्षक, ३२२ शिपाई आणि २७२ लेखनिक, पेपर ने आण करण्यासाठी २२२ रनर, १५ कस्टोडियन आणि ५० सहाय्यक कस्टोडियन यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. १५ पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर त्या शाळेतील मूळ केंद्रावर त्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागेल, अशा एकूण १९ शाळा जिल्ह्यांमध्ये आहेत. सहाय्यक कस्टोडियन मुख्य केंद्रावर तर रनर उपकेंद्रावर पूर्ण वेळ थांबून बैठे पथक म्हणून काम करतील. सर्व केंद्रावर आणि उपकेंद्रावर बैठक व्यवस्था, पुरेशे फर्निचर व इतर सुविधा (लाईट, पाणी) उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारच्या गैरमार्गाचा वापर होऊ नये यासाठी ७ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली असून यामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षणाधिकारी, डाएट प्राचार्य, डाएट ज्येष्ठ अधिव्याख्याता, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी आणि महिला पथक यांचा समावेश आहे.






























