अतिरिक्त पदभार असलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी जि प . सातारा च्या डॉ . वैशाली बडदे यांचा पदभार काढून जिल्ह्याला पूर्ण वेळ जिल्हा आरोग्य अधिकारी द्या – कास्ट्राईबची आरोग्य मंत्र्याकडे मागणी – – – – – कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ साताराचे जिल्हाध्यक्ष अजित वाघमारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री , आरोग्यमंत्री , प्रधान सचिव आरोग्य विभाग यांचे मागणी केली . त्यामध्ये डॉ . वैशाली बडदे यांचेकडे जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार गेली ३ -४ महिने असुन या कार्यकालात त्यांनी कार्योत्तर मंजुरी झालेल्या सर्व कामकाजाची चौकशीची मागणी केली आहे तसेच त्यांचे वर पक्षपाती पणाचा आरोप ही केला आहे . डॉ वैशाली बडदे या कामकाज करताना पक्षपाती पणा व भेदभाव करीत असुन , मा उपसंचालक पुणे (आरोग्य ) व मा . मुख्य कार्यकारी अधिकारी जि प . सातारा यांचा सुचनाचा अनादर करून बेकायदेशीर प्रतिनियुक्तीला अभय देण्याचे काम करीत असुन , संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत पुर्वगृहदुषित पणाने वागत आहेत असेही निवेदनात म्हटले आहे