तात्काळ स्वयंस्पष्ट खुलासा देण्याचा काढला लेखी आदेश
दहिवडी : अनुसूचित जाती जमातीतील घटकांना २०२२-२३ या वर्षासाठी शेतीपंप व घरगुती वीज पुरवठा करण्याबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी यांना शासनातर्फे निधी वितरित करण्यात आला होता, परंतु अद्यापही बहुतांश लाभार्थ्यांना कारणाशिवाय वीज पुरवठा केला नसल्याचे दिसून आल्याने दहिवडी येथील स्वप्निल मोरे यांनी माहितीच्या अधिकारात संबंधित विषयाची माहिती मागवली होती. या प्रकरणाबाबत तात्काळ स्वयंस्पष्ट खुलासा द्यावा, असा लेखी आदेश काढत समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना चांगलाच दणका दिला आहे.
माहिती अधिकार अधिनियम-२००५नुसार स्वप्नील मोरे यांनी मागितलेली माहिती मिळाल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी किंवा अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८७ (ॲट्रॉसिटी कायदा १९८९ )नुसार कारवाई करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना लेख काढलेल्या लेखी आदेशात असे म्हटले आहे की, स्वप्निल सुरेश मोरे यांनी अनुसूचित जाती जमातीतील घटकांना २०२३ या वर्षाकरिता शेतीपंप व घरगुती विद्युत पुरवठा करण्यासाठी शासनातर्फे महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी यांना निधी वितरित केला आहे. परंतु अद्यापही बहुतांश लाभार्थ्यांना कारणाशिवाय विविध पुरवठा केला नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. सदर संबंधित घटकांना त्यांच्या न्याय व मूलभूत हक्कापासून दूर ठेवण्याच्या प्रकारातीलच एक प्रकार म्हणून संबंधित संबंधितांवर अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी केलेली होती. त्या अनुषंगाने नितीन उबाळे यांनी अधीक्षक अभियंता यांना स्वप्निल मोरे यांच्या तक्रारीबाबत आपला खुलासा स्वयंस्पष्ट खुलासा तात्काळ देण्याचा आदेश काढत चांगलाच दणका दिला आहे.
महावितरणकडून मागासवर्गीय घटकातील लोकांना शासनाने निधी दिलेला असतानाही त्याचा लाभ देण्यात आला नाही. त्यामुळे अनुसूचित जाती/जमातीतील घटकांना विद्युत पुरवठ्याअभावी शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले नाही. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत महावितरणने शासन आदेश आणि निधी असतानाही वीज पुरवठा न केल्याने मागासवर्गीय घटकातील लोकांचे झालेले आर्थिक नुकसान म्हणजे महावितरण कंपनीकडून झालेले एकप्रकारचे आर्थिक शोषणच होय.
-स्वप्निल मोरे, सामाजिक कार्यकर्ते. दहिवडी.