बारामती :- बारामतीत आज २१ रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. काल बारामती मध्ये एकूण 109 नमुने (rt-pcr ) तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी 42 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये 33 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून बारामती शहरातील नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. व उर्वरित 67 जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. शहरातील पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भिगवन रोड येथील एक रुग्ण, ढवाण वस्तीतील एक रुग्ण, गुणवडी चौक येथील एक रुग्ण, कसबा येथील एक रुग्ण, अमराई येथील एक रुग्ण ,बारामती शहरातील तीन रुग्ण व भोई गल्ली येथील एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच बारामतीतील खाजगी प्रयोगशाळेमध्ये एकूण 35 जणांच्या नमुने अँँटीजेन तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी बारामती शहरातील आठ रुग्ण व ग्रामीण भागातील चार रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आलेला आहे. त्यामध्ये सिद्धेश्वर गल्लीतील एक, दूध संघ वसाहत येथील एक ,आमराई येथील 2 ,एमएसईबी कॉलनी येथील एक, मारवाड पेठ येथील एक,जळोची येथील एक व मार्केट यार्ड रोड आमराई येथील एक असे शहरातील आठ व माळेगाव येथील एक, पणदरे येथील एकाच कुटुंबातील दोन व मोरगाव येथील खाजगी रुग्णालयातील डॉक्टर असे एकूण 12 जणांचे एंटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे त्यामुळे आज सकाळ पर्यंत बारामतीतील (rt-pcr) 9 व एंटीजेन 12 असे एकूण 21 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व बारामती रुग्णसंख्या 406 झाली आहे. अशी माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली आहे.