महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :प्रतापसिंह भोसले (फलटण)
फलटण शहर व परिसरामध्ये आज बुधवार, दिनांक ५ ऑगस्ट सकाळ पासूननच पावसाची संततधार चालू असल्याने परिसरातील हात गाडीवाले व्यवसाईक, भाजीपाला विक्रेते, व इतर दुकानदार यांचा व्यवसाय पावसामुळे ठप्प झाला आहे. त्याचा परिणाम रहदारीवरही झालेला पहावयास मिळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
आज सकाळ पासूनच फलटण शहर व परिसरामध्ये पावसाची संततधार पडत आहे. रस्त्यावरील खड्डे व खाच खळगे पावसाच्या पाण्याने भरले आहेत. परिणामी रस्त्यावरील रहदारीवर परिणाम झालेला पहावयास मिळत आहे.