सध्या देशात व महाराष्ट्रात कोरोना विषाणुची साथ मोठया प्रमाणावर चालु असल्याने महाराष्ट्र सरकारने राज्यात
लॉकडाऊन आदेश लागु केलेले आहेत,तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 लागु केलेला आहे. त्या अनुशंगाने मा. जिल्हाधिकारी यानी सातारा जिल्ह्यात जमावबदी संचारबंदी आदेश लागु केलेले आहेत. महाराष्ट्र सरकार व साखरवाडी ता. फलटण हे गाव सध्या सुरू असलेल्या कोरोना विषाणु संसर्ग विरुद्धच्या लढाईत महत्वपुर्ण भुमिका बजावत असताना दि. 30/05/2020 रोजी एक व्यक्ती
साखरवाडी गावात कोरोना पॉसीटिव्ह सापडले असताना रोहन राजेंद्र काकडे रा. पिंपळवाडी साखरवाडी ता. फलटण याने त्याच्या फेसबुक अकाउंटवर साखरवाडी गावातील चार लोकांचे रिपोर्ट पॉसीटिव्ह अशी पोस्ट टाकुन सोशल मिडीयातुन जाणीवपूर्वक प्रशासन आणि महाराष्ट्र शासनाची व साखरवाडी (ता. फलटण) गावाची बदनामी तसेच सोशल माध्यमातून अफवा पसरवुन लोकांमध्ये भितीचे
वातावरण निर्माण केले .सदर व्यक्तीवर फलटण ग्रामीण पोलिसांनी कायद्यान्वये अफवा पसरवल्याबद्दल भारतीय दंड संहिता 1860 नुसार 499,500,50,554,52 गुन्हा दाखल केला आहे .अश्या अफवा पसरवणाऱ्यावर शासनाने कठोर कारवाई करावी अशी नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.



















