सातारा दि. 5 : कराड तालुक्यातील वडगाव उंब्रज येथील 49 वर्षीय महिला व 86 वर्षीय पुरुष असे दोन जणांचा रिपोर्ट कोरोना (कोविड 19) बाधित आहेत. तसेच 9 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. 6 जणं कोरोनामुक्त कोविड केअर केंद्र खावली ता. सातारा येथील 2 व कोविड केअर केंद्र, रायगाव ता. जावली येथील 4 असे एकूण 6 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 215 जणांचे नमुने पाठविले तपासणीला क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 68, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 15, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 6, ग्रामीण रुग्णालय, खंडाळा येथील 93, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 33 असे एकूण 215 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस, पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.