महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
सातारा दि.19 : सातारा तालुक्यातील मौजे वावदरे येथील रहिवासी असणारा एक कोरानो व्हायरस संक्रमीत रुग्ण आढळले होते. रुग्ण वास्तव्यास असणा-या विलगीकरण सेंटर पॉईंट केंद्रस्थानी धरुन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते.
सातारा तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती तथा तहसिलदार सातारा, तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी पंचायत समिती, सातारा यांच्याकडील अहवालानुसार उपविभागीय दंडाधिकारी तथा इंन्सिडंट कमांडर, सातारा मिनाज मुल्ला यांनी सातारा तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीमधील मौजे निसर्ग कॉलनी शाहुपूरी या क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्र उठविणे, शिथिल, निरस्त करण्याबाबतचा आदेश पारीत केला आहे. तथापि निरस्त, शिथिल, प्रतिबंधित क्षेत्राबाबत म्हणजेच जे सामान्य क्षेत्राबाबत जिल्हादंडाधिकारी, सातारा यांच्याकडील 31 मे 2020 अनव्ये तसेच शासनाकडून प्राप्त होणारे कोरोना (कोवीड-19) बाबतचे आदेश व दिशानिर्देश असतील ते सर्व त्यांचेवर बंधनकारक राहतील.