
बारामती प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर पोलीस अंतर्गत येणाऱ्या करंजेपुल दूर क्षेत्रातील पोलिसांनी सोमेश्वर नगर येथे रस्त्यावर फिरणाऱ्या विना मास्क नागरिकांवर कारवाई करत चार हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केला .वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे आणि करंजेपुल ग्रामपंचायत यांच्या संयुक्त रित्या करोना रुग्ण सापडले असल्यामुळे इथून पुढे अशी दंडात्मक कारवाई मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर करण्यात येणार आहे. मास्क वापरणे बंधनकारक आहेया करवाई दरम्यान करंजे पूल पोलीस दूर क्षेत्राचे पोलीस हवालदार महिंद्र फणसे , पोलीस नाईक सिताफ लोकरे ग्रह रक्षक दल तुषार साळुंके, ओंकार सौरभ पटेल तसेच करंजेपुल ग्रामपंचायत सरपंच वैभव गायकवाड, ग्रामसेवक आबासाहेब यादव कर्मचारी श्रीकांत शेंडकर , योगेश गायकवाड सूर्यकांत गायकवाड उपस्थित होते































