महाराष्ट्र न्यूज वडगाव निंबाळकर प्रतिनिधी संतोष भोसले
कोरोनाच्या संकटामुळे जनता त्रस्त झाली असतानाच केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ केली यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला मोठा आर्थिक फटका बसत आहे. जनमानसांच्या मनातील भावना लक्षात घेऊन काँग्रेसच्या वतीने बारामती येथे आंदोलन करण्यात आले. अशी माहिती बारामती तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर यांनी दिली. येथील काँग्रेस भवन समोर काँग्रेस कार्यकर्ते एकत्र आले होते यामध्ये शहराध्यक्ष अशोक इंगोले, प्रांत सदस्य ॲडव्होकेट आकाश मोरे, जिल्हा युवक सरचिटणीस वीरधवल गाडे, तालुका युवक अध्यक्ष वैभव बुरुंगले,शहर उपाध्यक्ष सुरज भोसले शहर सरचिटणीस भरत रामचंद्रे, माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब देवकाते, शंकरराव झारगड यांचा समावेश होता. मोदी सरकार विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त करणारे निवेदन बारामती प्रांत अधिकारी कार्यालयात देण्यात आले. डिझेल आणि पेट्रोल दरवाढीमुळे महागाई मध्ये वाढ होऊन गरिबांना याचा फटका बसेल यासाठी केंद्र सरकारने गोरगरीब जनतेचा विचार करायला हवा, केंद्र सरकारच्या धोरणांबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.