महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :फलटण
सध्या सातारा जिल्ह्यामध्ये अनेक भागांमध्ये खाजगी दवाखान्यांमध्ये कोरोनाचे उपचार सुरू आहेत सरकारी हॉस्पिटलमध्ये पेशंट संख्या जास्त असल्यामुळे लोकांना खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागत आहेत यामध्ये महाराष्ट्र शासनाने व जिल्हाधिकारी कार्यालयाने मेडिकल बिलाचे दर ठरवले असताना देखील फलटणमधील काही खाजगी डॉक्टर पेशंट कडून जास्त रक्कम घेत आहे तरी त्या डॉक्टरांची चौकशी समिती नेमून खाजगी दवाखान्याचे बिले तपासावे व सर्वसामान्य नागरिकांना योग्य न्याय दिला पाहिजे अशी मागणी ॲड सचिन शिंदे यांनी सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की ग्रामीण भागातील शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे .काही खाजगी दवाखान्याच्या माध्यमातून कोरोना पेशंटची मोठ्या प्रमाणात लूटमार सुरू आहे त्यामुळे लोकांच्या खिशाला आर्थिक ताण सहन करावा लागत आहे त्यामुळे सरकारने या प्रकरणात लक्ष घालून ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांना न्याय दिला पाहिजे अशी मागणी शिंदे यांनी केली आहे