महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :(दहिवडी )
सरकारला चांगली बुद्धी द्यावी म्हणून गाईचे दूध निवेदनाबरोबर पाठवले मंत्र्यांना
राज्यातील शेतकरी अडचणी मध्ये सापडला असताना सरकार ला या शेतकऱ्यांची दया येत नाही. कोरोनाच्या काळात कामे नाहीत शेतीमधून उत्पन्न नाही पिकवलेल्या मालाला दर नाही. दुधाला दर नाही सरकार मात्र शेतकऱ्याच्या हिताची कोणतीही चांगली भूमिका घ्यायला तयार नाही. हाटेल व्यवसाय बंद आहेत त्यामुळे दुधाला खप नाही आणि दरही नाही तरी दुधाला प्रति लिटर१० रुपये अनुदान व दुध पावडर ला प्रति किलो ५० रुपये अनुदान महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात यावे .
अन्यथा 1 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पार्टी रासप रिपाई रयत क्रांती शिवसंग्राम या पक्ष्यांच्या वतीने राज्यभर दूध एल्गार आंदोलन करण्यात येईल या संदर्भात माण खटावचे आमदार जयकुमार गोरे भाऊ
यांच्यावतीने माण खटावच्या प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले निवेदना बरोबर या सरकार ला दूध दरवाढी साठी सुबुद्धी द्यावी म्हणून माण खटाव मधील गाईचे पवित्र दूध पुढ्या मधून पाठवत आहे. हे दूध मंत्रालयातील मंत्र्यांनी पिले तर सुबुद्धी येईल आणि दुधाला दरवाढ मिळेल अशी अपेक्षा आहे असे ते यावेळी म्हणाले