महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : कण्हेरखेड
वेलंग येथील १५५ एकर क्षेत्रास “संरक्षक जलसिंचन करणाऱ्या” कृष्णाई सिमेंट बंधाऱ्याचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष मा. सुनील माने यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक ३०ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी ५.०० वाजता संपन्न होणार आहे.
यावेळी निर्माणाधीन वैकुंठ मुक्तिधाम प्रकल्पाची पाहणी सुद्धा नामदार बाळासाहेब पाटील करणार आहेत.
सदर कार्यक्रमास रहिमतपूर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा कोरे, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या व्हा.चेअरमन लक्ष्मीताई गायकवाड, संचालक कांतीलाल पाटील, अविनाश माने, कोरेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन भागवतराव घाडगे, वसंतराव कणसे, कोरेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब गायकवाड, धामणेर गांवचे आदर्श सरपंच शहाजीराव क्षीरसागर, जिल्हा जल व मृद संधारण साताराचे कार्यकारी अभियंता रणजित ओतारी, रहिमतपूरचे नगरसेवक विद्याधर बाजारे, जल व मृद संधारण उपविभाग अधिकारी मिलिंद पवार, जलसंधारण अधिकारी सातारा बाबासाहेब पाटील उपस्थित राहणार आहेत.
तरी सदर कार्यक्रमास पंचक्रोशीतील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन ॲड.विजयराव शिंदे, कण्हेरखेडचे सरपंच संजय शिंदे व वेलंगचे सरपंच दत्तात्रय जेधे यांनी केले आहे.