सुनील निंबाळकर/ बारामती प्रतिनिधी :
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दिनांक १५ तारखेपासून निवडणुकीला सुरुवात होत आहे. अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना आपले मत व्यक्त केले. गेल्या एक वर्षापासून सोमेश्वर ची निवडणूक होणार अशी चर्चा होती, मात्र झाली नाही.मात्र आज कारखान्याच्या निवडणूक कार्यक्रमावर शिक्कामोर्तब झाले. असून संचालक मंडळाची मुदत संपून जवळपास एक वर्ष झाले कोविड संसर्गामुळे राज्यातील अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या होत्या मध्यंतरी दोन वेळा निवडणुका जाहीर होऊन त्या पुन्हा रद्द करण्यात आल्या होत्या.
आज कारखान्याची निवडणूक, निवडणूक अधिकारी बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे आणि निवडणूक प्राधिकरण यांनी सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.तब्बल ३७ दिवसांचा हा निवडणूक कार्यक्रम राहणार आहे. यामुळे आता उद्यापासून इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरुवात होणार आहे संचालक पदाची माळ आपल्या गळ्यात कशी पडेल, यासाठी जो तो आपापल्या पद्धतीने प्रयत्न करणार आहे.
दरम्यान शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी यापूर्वी सोमेश्वर ची निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे त्यामुळे राष्ट्रवादीचा पक्षाचा बर्यापैकी मार्ग सुकर होणार असला,तरी निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरवले असले तरी सर्वांना विचारात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निर्णय घ्यावा लागणार आहे
असा असेल निवडणूक कार्यक्रम…
१५ ते २२ फेब्रुवारी अर्ज भरणे २३ फेब्रुवारी छाननी २४ फेब्रुवारी यादी प्रसिद्ध २४ फेब्रुवारी ते १० मार्च अर्ज माघारी १२ मार्च अंतिम यादी प्रसिद्ध आणि चिन्ह वाटप २१ मार्च मतदान २३ मार्च मतमोजणी आणि निकाल
असे असेल संचालक मंडळ
गट १ निंबुत- खंडाळा ३ उमेदवार गट २ मुरूम- वाल्हा ३ उमेदवार गट ३ होळ-मोरगाव ३ उमेदवार गट ४ कोऱ्हाळे- सुपा ३ उमेदवार गट ५ मांडकी -जवळार्जुन ३ उमेदवार ब वर्ग सभासद १ उमेदवार अनुसूचित जाती जमाती १ उमेदवार महिला राखीव २ उमेदवार इतर मागासवर्गीय १ उमेदवार भटक्या विमुक्त जाती व जमाती १ उमेदवार अशा पद्धतीने संचालकांची यादी आहे.