महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी / खटाव :
खटाव तालुक्यातील खटाव येथील बाबासो अब्दुल रशीद काझी याला सातारा वनविभागाने काही अटीवर सर्पमित्र म्हणून ओळखपत्र देऊन लोकवस्तीवर येणाऱ्या विषारी सर्पांना पकडून वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना घेऊन 24 तासाच्या आत वनक्षेत्रात सोडून देण्याच्या अटीवर सर्पमित्र ओळखपत्र देण्यात आले होते. मात्र सदर सर्पमित्राने असे न करता तीन नाग जातीचे सर्प गेली तेरा ते चौदा दिवस
घरात बंदिस्त ठेऊन वन्यजीव( संरक्षण ) अधिनियम 1972 चे कलम 9 चे उल्लंघन केल्या प्रकरणी सदर व्यक्तीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी करण्यात येत आहे. त्याच्या ताब्यातील तीन नाग जातीच्या सर्पला वनक्षेत्रात सुखरूप सोडण्यात आले आहे. सदरची कारवाई ही डॉ भारतसिह हाडा उपवनसंरक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली, एस बी चव्हाण सहाय्यक वनरक्षक सातारा यांचे नियंत्रणाखाली, वनक्षेत्र रक्षक एस एन फुंदे यांच्या पथकाने व कर्मचारी यांनी केली आहे. तसेच सर्व सर्पमित्र यांना आवाहन करण्यात येते की विषारी सर्पला आपण पकडून वनविभागाच्या कर्मचाऱ्या सोबत 24 तासाच्या आत वनक्षेत्रात सुखरूप सोडून देण्यात यावे.