एका शेळीचा फडशा , उजनीचा काठ हादरला
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले(कळंब – इंदापूर)
इंदापूर तालुक्यातील उजनी जलाशयाच्या काठी भावडी, चांडगाव, वरकुटे बुद्रुक, चितळकरवाडी भागात बिबट्याचा वावर दिसला असून उजनीच्या पाणलोट क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी सकाळी एका शेळीचा फडशा बिबट्याने पाडला, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान वनविभागाच्या अधिकारी यांना बिबट्या आज सकाळी प्रत्यक्ष दिसला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

उजनी पाणलोट क्षेत्रातील भावडी, चांडगाव, वरकुटे बुद्रुक, चितळकरवाडी या गावातील ग्रामस्थांनी स्वतः बिबट्या पाहीला असल्याचे म्हटले आहे. याबाबत इंदापूर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी बिबट्या नदीकाठच्या गावात आला असल्याची माहिती दिली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.






























