महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : बारामती
बारामती शहर व तालुक्यामध्ये जनता कर्फ्यू उठवण्याचा परिणाम दिसू लागला आहे, काल शासकीय तपासण्या झाल्या त्यापैकी ४४ जण कोरोनाबाधित आढळले आहेत.त्यामुळे आज रुग्णसंख्या वाढली आहे. बारामतीतील रुग्णांची संख्या ९२ झाली आहे.
बरामती शहरातील शासकिय तपासणीत आढळलेल्या कोरोनामध्ये एमआयडीसी, सहयोग सोसायटी, वाढणे या परिसरातील रुग्णांचा समावेश आहे.शासकीय तपासणीत आमराई येथील ५७ वर्षीय पुरुष, २६ वर्षीय पुरुष, सावळ येथील ६० वर्षीय पुरुष, नीरा वागज येथील ३७ वर्षीय पुरुष, श्रीराम नगर येथील ४ वर्षीय मुलगी, इंदापूर रोड येथील ३५ वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील ३९ वर्षीय पुरुष, सुभाष चौक येथील ३९ वर्षीय पुरुष, जळोची येथील ३५ वर्षीय पुरुष, माळेगाव येथील ५७ वर्षीय पुरुष, तांबेनागर येथील २७ वर्षीय पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
बारामती शहरामधील खासगी प्रयोगशाळेत तपासलेल्या कोरोनाबाधितांमध्ये काटेवाडी येथील ६ वर्षीय मुलगा, मुरूम येथील ४२ वर्षीय पुरुष, उंडवडी कडेपठार येथील ४० वर्षीय पुरुष, कारंजेपूल येथील ३५ वर्षीय महिला, कोऱ्हाळे बुद्रुक येथी ७५ वर्षीय प्ररुष,अशोक नगर येथील १६ वर्षीय मुलगी, अशा रुग्णांचा समावेश आहे.